आष्टी
आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबत सुरू असेलल्या तर्क वितर्क यांना पूर्ण विराम मिळाला आहे. आष्टी विधानसभेसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून माजी आमदार सुरेश धस यांना जाहीर करण्यात आली. त्यापूर्वीच त्यांनी आपला महायुतीचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे आणि आमदार सुरेश धस यांच्यात रस्सीखेच सुरू होती. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनी हक्क सांगितला होता. त्यासाठी विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे आग्रही होते. तर दुसऱ्या बाजूला हा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी आमदार सुरेश धस हे प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले. भाजपाकडून माजी आमदार भीमराव धोंडे हेही इच्छुक होते. आता अधिकृत उमेदवारी मिळाल्यामुळे धसांचा मार्ग मोकळा झाला आहे.
उमेदवारी अर्ज जाहीर होण्यापूर्वीच माजी आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे जोरदार शक्ती प्रदर्शन केले. संपूर्ण विधानसभा मतदारसंघातून मतदार अर्ज भरण्यासाठी आष्टी येथे दाखल झाले होते. आष्टी शहराच्या सर्व बाजूने येणाऱ्या रस्त्यावर मतदारांचे लोंढे शहरात दाखल झाले.
सुरेश धस यांच्या बंगल्यापासून आष्टी तहसील कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ही मिरवणूक बाजार तळ येथे पोहचली. यावेळी भव्य सभा घेण्यात आली.यावेळी सुरेश धस यांनी नागरिकांना भावनिक आवाहन करत आपल्याला निवडून देण्याचे आवाहन केले.