अनुष्का बेद्रेचा हस्ताक्षर स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक

- Advertisement -
- Advertisement -

 

आष्टी । प्रतिनिधी

वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टीची गुणवंत विद्यार्थिनी कुमारी अनुष्का  बेद्रे इयत्ता पाचवी हिने बालसंस्कार समुह आयोजित राज्यस्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत मोठ्या गटातून इयत्ता (पाचवी ते आठवी) द्वितीय क्रमांक पटकावून राज्यामध्ये वसुंधरा शाळेचे नाव गाजवले आहे यापूर्वी अनुष्काने राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये जवळ जवळ सात वेळा यश संपादन केले आहे.
सुंदर हस्ताक्षर ही कला आहे आणि ही कला आपण सरावाने साध्य करू शकतो याच प्रमाणे अनुष्का रोज एक तास सराव करते त्याचबरोबर कॅलिग्राफी लेखनही उत्तम प्रकारे करते. कोरोना महामारीत शाळा बंद आहेत त्यामुळे मुलांचे लेखन कमी झाले आहे या कारणाने हस्ताक्षर म्हणावे तशे चांगले राहिले नाही, शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन विविध स्पर्धा होत असतात अशाच प्रकारे बाल संस्कार समूह महाराष्ट्र यांनी राज्यस्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना लेखन कला विकसित करण्याची प्रेरणा दिली…
या हस्ताक्षर स्पर्धेमध्ये मोठा गट व लहान गट अशा दोन गटांमध्ये स्पर्धा आयोजित केली होती मोठ्या गटात जवळजवळ 3500 अक्षरांचे नमुने आले होते. या नमुन्या मधून अनुष्काचे सुंदर हस्ताक्षर पाहून आयोजक प्रभावित झाले व त्यांनी इतर स्पर्धकांच्या तीन दिवस अगोदर अनुष्काचा नंबर जाहीर केला ही या स्पर्धेमधील विशेष गोष्ट म्हणावी लागेल.
सुंदर हस्ताक्षर कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे इयत्ता पाचवीत शिकणारी चिमुरडी अनुष्का अनिल बेद्रे….राज्याचे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे साहेब,शिक्षण उपसंचालक काठमोरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आॅनलाईन बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावरअंमलबजावणी संचालनालय (ईडी)चा छापा

अनुष्काच्या या उत्तुंग यशाबद्दल शिक्षण विस्ताराधिकारी मा. श्री मनोरंजन धस साहेब यांनी अनुष्काचे भरभरून कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी येथील सर्व शिक्षक वृंद व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोंदार्डे मॅडम यांनी अनुष्काचे अभिनंदन केले. या यशाबद्दल विविध स्तरातून सर्व पत्रकार मित्र,मित्रपरिवार व वरिष्ठ अधिकारी वर्ग यांनी अनुष्काचे अभिनंदन केले…

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles