अहमदनगर
Anna hazare राज्य सरकारच्या सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री संदर्भातील निर्णयाला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विरोध anna hazare threatens केला होता.
हा निर्णय मागे घ्यावा यासाठी अण्णा हजारे यांनी 14 पासून आंदोलन hunger strikes करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.
मात्र राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाच्या सचिव वत्सला नायर यांनी अण्णा यांची भेट घेऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर अण्णा हजारे यांनी आपले उद्यापासून होणारे आंदोलन स्थगित केले आहे.
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला दिनांक 14 फेब्रुवारी पासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यापूर्वी अन्नांनी हे उपोषण मागे घेतले आहे.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाईन sale of wine at supermarkets विक्रीसंबंधी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून walk in shops वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते.
पण या निर्णयामुळे लहान मुले तरुण व्यसनाधीन होऊ शकतो, महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही, याची खंत वाटते.
युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे हेही आश्वचर्यकारक आहे.
गेल्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून वाईन विक्रीच्या निर्णयाला कडाडून hazare threatened विरोध होत आहे. राज्यातील 36 जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे संघटन आहे.
त्या सर्व कार्यकर्त्यांनी आपणाकडे निवेदन पाठवून जाहीर विरोध दर्शविलेला आहे. तसेच राज्यातील विविध बिगर राजकीय, सामाजिक संघटना आमच्याकडे येत आहेत. चर्चा करीत आहेत.
या सर्वांची या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन करण्याची तयारी आहे. तरीही सरकारला जाग येत नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय दिसत नाही ,social activist anna hazare असे म्हटले होते
13 फेब्रुवारी रोजी उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य सचिव वत्सला नायर यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णा यांच्या सोबत बैठक केली.
Anna hazare यांचे उपोषण मागे
ही बैठक उशिरापर्यंत सुरु होती. या दरम्यान नायर यांनी अण्णा यांच्या अटी मान्य करत राज्यातील जनतेची मते घेऊनच हा निर्णय जाहीर केला जाईल असे सांगितले.
तसेच राज्यातील वृत्तपत्रे, इलेक्ट्रोनिक माध्यमे यांच्याद्वारे हरकती मागविण्याच्या सूचना प्रसिद्धी करून तीन महिन्यात लोकांच्या प्रतिक्रिया घेऊनच हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने अण्णा हजारे यांनी आपला निर्णय स्थगित केला.
आज राळेगण सिध्दी येथे आयोजित सप्ताह च्या कार्यक्रमात अण्णा यांनी ग्रामसभा घेऊन या निर्णयाला विरोध करत असल्याचे जाहीर केले. तर ग्रामसभेच्या निर्णयाने हे आंदोलन स्थगित करत असल्याचे ahmednagar district जाहीर केले.