अहमदनगर
ambajogai peoples co-op bank ahmednagar news अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या अहमदनगर शाखेच्या नूतन वास्तूचा शुभारंभ माजी मंत्री धनंजय मुंडे,आमदार संग्राम भैया जगताप व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राज्यात सर्वात फायद्याची अहमदनगरची शाखा ठरावी असे प्रतिपादन माजीमंत्री धनजंय मुंडे यांनी केले. बँकेचे १००० कोटीवरून 2 हजार कोटी होण्यास वेळ लागणार नाही. असेही ते यावेळी म्हणाले.
अहमदनगर येथे अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेच्या नूतन वास्तूचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन माउली संकुल येथे आयोजित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संजय दौंड,बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी,माजी आमदार पृथ्वीराज साठे,राजेश चव्हाण,विष्णुपंत सोळंके, बबन लोमटे, व्हा.चेअरमन प्रकाश सोळंकी, रमेश आडसकर आदि उपस्थित होते.
आणखी वाचा : स्फोट झाला.. ते पळाले आणि पुढे काय घडले?
यावेळी बोलताना मुंडे म्हणाले कि, इथे कोणी कोणावर विश्वास ठेविना, बहिण भावावर विश्वास ठेवीना,मात्र बँकेच्या ठेवी 10 लाखाच्या ठेवी वरून 550 कोटी गेल्या हा मोठा विश्वास आहे.या बँकेने महाराष्ट्रात मोठे नाव केले आहे. बीड जिल्ह्यातून लोक इकडे पश्चिम महाराष्ट्रात उस तोडायला येतात. पण मोदी यांनी बँक काढून राज्यात नाव केले.
मोदी यांनी अंबाजोगाई परिषदेचे नेतृत्व केले, अहमदनगरची शाखा 16 वी शाखा आहे.सर्वात फायद्याची शाखा नगरची राहील,सहकाराची मुहूर्तमेढ या जिल्ह्यात रोवली गेली. त्यामुळे याचा फायदा नक्कीच होईल.
बँकिंग ची वाईट अवस्था झाली आहे. बँकिंग समोर मोठे आव्हान आहे,त्यामुळे चांगले काम केले तर बँका टिकतील असे धनजंय मुंडे यांनी सांगितले.