मा.आ.भीमसेन धोंडे यांनी अक्षय तृतीया सणानिमित्त कोरोना बाधित रुग्णांना दिले गोड जेवण.
आष्टी-प्रतिनिधी
साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेला महत्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया. या शुभ दिनी सर्वच घरी गोड जेवण करतात मात्र यंदा कोरोना महामारीमुळे अनेक लोक कोरोना बाधित असल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत ज्यांना या सणाचे गोड जेवण देऊन सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आष्टी, पाटोदा, शिरुर विधानसभा मतदारसंघाचे जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांनी आज ग्रामीण रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांना गोड जेवण दिले आहे.
गेल्या वीस दिवसांपासून आष्टी, पाटोदा व शिरुर या तिनही तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना चांगल्या प्रतीचे जेवण आष्टी, पाटोदा, शिरुर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांनी अविरत अन्नसेवा नावाने जेवणाची सुविधा सुरु केली आहे. आज अक्षय तृतीया हा सण आहे ज्या दिवशी सर्वच घरी गोड जेवण करुन सण साजरा करतात मात्र अनेक लोक कोरोना बाधित असल्याने रुग्णालयात उपचार घेत असून त्यांनाही अक्षय तृतीया सणाचा आनंद घेता यावा करीता आज आष्टी, पाटोदा व शिरुर या तीनही तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना आंब्याचा रस, चपाती व व्हेज पुलाव असा वेगळा मेनू जेवणात देऊन रुग्णांमध्ये आनंदी, सकारत्मक वातावरण निर्मिती केली आहे.
आणखी वाचा: कोरोना रूग्णांना महावितरण कर्मचा-यांनी दिले जेवण
ग्रामीण रुग्णालयात बहुतेक गरीब रुग्ण दाखल असतात ज्यात तालुक्यातील विविध गावातून हे रुग्ण तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असतात. बहुतेक वयोवृद्ध रुग्णांचे जेवणाअभावी हाल होतात तर काही रुग्णांचे घर दूर अंतरावर असल्याने वेळेवर जेवण उपलब्ध होत नाही. अशा अनेक अडचणी लक्षात घेऊन मा.आ.भीमसेन धोंडे यांनी गेल्या वीस दिवसांपासून आष्टी, पाटोदा व शिरुर या तीनही ठिकाणी अविरत अन्नसेवा सुरु करुन कोरोना बाधित रुग्णांच्या जेवणाची योग्य सोय केल्याने रुग्ण व नातेवाईक समाधानी आहेत. तसेच रुग्णालयात काम करणारे वैद्यकीय कर्मचारी, वॉर्ड बॉय, नर्सेस यांना देखील गरजेनुसार या अन्नसेवेचा लाभ मिळत असल्याने रुग्ण, नातेवाईक व वैद्यकीय कर्मचारी यांनी मा.आ.भीमसेन धोंडे यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.