एड्स जनजागृती व HIV तपासणी कार्यक्रम वासनवाडी येथे संपन्न

- Advertisement -
- Advertisement -

राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान कडून एड्स जनजागृती व HIV तपासणी कार्यक्रम वासनवाडी येथे संपन्न.

बीड 25 डिसेंबर,प्रतिनिधी

1डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत सुरू असलेल्या एड्स जनजागृती व HIV तपासणी कार्यक्रमाचे वासनवाडी येथे आयोजन करण्यात आले.
दरवर्षी 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत एड्स जनजागृती आणि एच आय व्ही तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान वासनवाडी, नेहरू युवा केंद्र बीड व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दि 25 रोजी वासनवाडी येथे जनजागृती व तपासणी कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनार्धन माचपल्ले(समुपदेशक)एफ. आर. इनामदार(प्रयोगशाळा तंत्रज्ञ ) अशोक तांगडे, तत्वशिल कांबळे ग्रामसेवक रवी घोडके उपस्थित होते.

हेही वाचा:कृषी कायदा शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारा,शेतकऱ्यांच्या हिताचा खा. प्रीतम मुंडे

यावेळी बोलताना माचपल्ले म्हणाले,की 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो यावर्षी 2020 ची थिम “जागतिक एकता आणि सामाजिक जबाबदारी”ही असून एड्स होण्याची प्रमुख चार कारणे त्यांनी सांगितली.यावेळी कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्वांची HIV तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचे आभार ग्रामसेवक रवी घोडके यांनी मानले.

Related Articles

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles