करंजी –
Ahmednagar pathardi tankar burnt मराठवाडी ता. आष्टी येथे टोलनाक्याजवळ रात्री साडेबारा वाजता डिझेल टॅन्करला आग लागून टॅकर व त्यामधील त्यामधील डिझेल जळून खाक झाले.
बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुंबईहुन बीडकडे जाणारा जिओ रिलायन्स डिझेल टँकर क्र. एम एच २० सी जी – ०८९१ हा २५ हजार लिटर डिझेल घेवुन जात असलेला टँकर ड्रायव्हर ने काम चालु असलेल्या टोलनाक्यावर रस्त्याच्या कडेला उभ करून चहा घेत असताना अचानक टायर फुटले व त्याने पेट घेतला. क्षणात टँकरनेही पेट घेतला.
त्यावेळी आगीचे मोठ-मोठ लोळ आकाशाला भिडले, या आगीमुळे रस्यावरून गेलेल्या उच्च दाबाच्या विजेच्या तारा रस्त्यावरच गळुन पडल्या. राजमाता आश्रम शाळेचे अधिक्षक सतिश मराठे यांसह स्थानिक गावकरी यांनी अंभोरा, ता. आष्टी पोलिस स्टेशनला कळवले.
त्यानंतर पोलीस कर्मचारी यांनी आष्टी , नगर व वृध्देश्वर येथील चार अग्निशामक दलाच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला.तब्बल दोन तासांनंतर आग आटोक्यात आणली. या आगीत टँकर पुर्णपणे जळुन खाक झाला. तसेच महावितरणने विज पुरवठा तात्काळ खंडीत केल्याने मोठा अनर्थ टळला.
यावेळी महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.या टॅन्करला लागलेल्या आगीमुळे पायी जाणाऱ्या भक्ताचे व प्रवाशांचे मोठे हाल झाले, सुदैवाने या दुर्घटनेत जिवीतहानी झाली नाही.
नगर-पाथर्डी महामार्गावर रस्त्यातच टॅन्करला लागलेली आग विझविण्यासाठी अग्नीशमाक दल , आंभोरा पोलीस उपनिरिक्षक सतीश ढाकणे , बीट अंमलदार शांताराम रोकडे यांसह मराठवाडी तांडा येथील अनिल मुरकुटे, सतीश मराठे, म्हातारदेव मराठे, माणिक मराठे, रमेश जाधव, महादेव मराठे, परशुराम मराठे, शुभम औटे, अशोक मराठे, अशोक कोतकर, मच्छिंद्र घोडके, गणेश हाडे, पप्पु मराठे, बन्सी मराठेसह अनेक स्थानिक कार्यकर्त्यानी व तरुणांनी या टॅन्करची आग विझविण्याचा प्रयत्न करुन प्रवाशांना , प्रवासी वाहनांना व भाविकांना मदत केली.