आष्टी प्रतिनिधी
जामखेड नगर रोड वर असलेलेली अतिक्रमणे काढण्यास आमदार बाळासाहेब अजबे यांच्या हस्तक्षेपाने स्थगिती मिळाली असून या व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अहमदनगर ते कडा आष्टी जामखेड बीड या महामार्गाचे काम अद्याप मंजूर झाले नाही व कुठेही बजेट पडले नसल्याने या महामार्ग लगत आजच जमीन अधिग्रहण करणे योग्य नाही , सध्या कोरोना साथीमुळे सर्व छोटे मोठे व्यापारी हैराण झाले आहेत त्यामुळे या रस्त्यावरील दुकाने काढुन व्यावसायिकांना रत्यावर आणू नये ,या महामार्गाचे काम सुरू झाल्यावर त्वरित जागा अधिग्रहित करावी तत्पूर्वी अतिक्रमणे न काढता जागाअधीग्रहण करण्यास तूर्त स्थगिती द्यावी अशी मागणी आमदार बाळासाहेब आजबे यांनी मुंबई येथे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्याकडे केली असता त्यानुसार पालकमंत्री ना. धनंजय मुंढे यांनी दखल घेत तात्काळ राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता नासिक, जिल्हाधिकारी बीड ,आणि पोलिस अधिक्षक बीड यांना आदेशीत करून जागा अधिग्रहनास तात्काळ स्थगित करण्याचे सांगितले असल्याचे आ.आजबे यांनी सांगितले.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून अहमदनगर ते जामखेड बीड पर्यंत राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाला आहे परंतु आता त्याचे नूतनीकरण झाले आहे त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण कधी होईल ते सांगता येत नाही असे असतानाही संबंधित विभागाने दोन दिवसात अतिक्रमणे काढण्याचा घाट का घातला आहे हे समजत नाही ज्या वेळेस रस्त्याचे काम सुरू होईल त्यावेळेस राष्ट्रीय महामार्ग नियमाप्रमाणे जागा अधिग्रहण करावी, आष्टी कडा आणि धानोरा या ठिकाणच्या काही व्यापारी यांना राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता अहमदनगर या कार्यालयाचे वतीने आज दिनांक दोन जून रोजी देऊन रात्रीतून जागा खाली करा नाही तर तुमच्याकडून वसुली करण्यात येईल अशी नोटीस दिल्यामुळे व्यापारी घाबरून गेल्याचे समजताच आ.आजबे यांनी मुंबई येथे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला त्यावर पालकमंत्र्यांनी या कोरणा काळात असले प्रकार होऊ देणार नाही रस्ता कामाला बजेट पडू द्या रस्ता काम चालू झाल्याबरोबर अतिक्रमण काढता येईल हा जनतेला घाबरण्याचा प्रकार बंद करा असे आदेश राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे कार्यकारी अभियंता जिल्हाधिकारी बीड व पोलिस उपअधीक्षक बीड यांना दिले आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांनी घाबरून न जाता आपल्या दुकानातील सामान इतरत्र हलू नये तूर्तास कुठलिही जागा अधिग्रहित केली जाणार नसल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.त्यामुळे व्यापारी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे .