अहमदनगर: ८६ रूग्णांना डिस्चार्ज तर ८२ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

- Advertisement -
- Advertisement -

 

आज ८६ रूग्णांना डिस्चार्ज तर ८२ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर: जिल्ह्यात आज ८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार ८१७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९४६ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४६ आणि अँटीजेन चाचणीत ६ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०४, जामखेड ०४, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०७, पारनेर ०१, पाथर्डी ०४, राहता ०५, श्रीगोंदा ०२ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०१, पाथर्डी ०१, राहाता ०१, राहुरी ०१, संगमनेर ११,शेवगाव ०३, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट ०१ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ०६ जण बाधित आढळुन आले. नगर ग्रामीण ०४, नेवासा ०१, आणि पारनेर ०१, अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा २०, अकोले ०२, जामखेड ०१, कर्जत ०१, कोपर गाव ०४, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०२, पारनेर ०२, पाथर्डी ०८, राहाता ०४, राहुरी ०४, संगमनेर १४, शेवगाव ०३, श्रीगोंदा १०, आणि श्रीरामपूर ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:६९८१७*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: ९४६*

*मृत्यू:१०९३*

*एकूण रूग्ण संख्या:७१८५६*

हेही वाचा:स्व गोपीनाथ मुंडे ग्रामसचिवालयाचे ना मुंडे च्या हस्ते लोकार्पण

 

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles