- Advertisement -
- Advertisement -
अहमदनगर
केवळ घाणेरडे राजकारण पुढे करून तालुक्याचे आरोग्य धोक्यात आणणारे लोकप्रतिनिधी आयत्यावर कोयता करून आपले राजकारण करत आहे त्याला बहुजनांचे नेते जाणीवपूर्वक मदत करत असल्याचे चित्र आहे . त्यामुळे या प्रवृत्तीचा मी निषेध करत असल्याचे पत्रक अहमदनगर जिल्हा भाजप सांस्कृतिक प्रतोद संदीप दात खिळे यांनी काढले आहे .
त्यांनी आपली भूमिका मांडताना आज अगस्ती आश्रम येथे कोरोना काळजी केंद्र उदघाटन झाले या उदघाटनाला माजी मंत्री व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय मधुकराव पिचड साहेब व माजी आमदार वैभव पिचड यांना आमंत्रण देणे गरजेचे होते असे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना वाटते . ज्येष्ठ नेते वसंत मंकर व नगरसेवक सचिन शेटे यांच्या उपस्थितीमध्ये माननीय मधुकराव पिचड साहेबांनी तहसीलदार साहेबांना फोन केला होता आणि त्या वेळी सांगितले होते की आपल्याला अगस्ति आश्रम येथे कवडी सेंटर उघडायचे आहे त्या वेळेस तहसीलदार साहेबांनी लगेच त्या जागेची पाहणी केली . त्यावेळी त्यांना सांगितले की कारखान्यातर्फे बेडची व्यवस्था करू बाकीची जबाबदारीही प्रशासनाने घ्यावी असे पत्र तहसीलदार साहेबांना देण्यात आले त्यावेळी मानकर साहेबांनी साहेबांना सांगितले की अगस्ती देवस्थान ट्रस्ट भक्त निवासाचे काम अपुरे आहे आणि आठ दिवसाच्या आत आपण ते काम पूर्ण करू तेथे कोविड सेंटर सुरू . पिचड साहेबांनी लगेचच अगस्ती देवस्थानचे अध्यक्ष के.डी.अण्णा धुमाळ यांना फोन केला व अगस्ती वर सेंटर सुरू करण्याची कल्पना दिली आणि लगेच तहसीलदार साहेबांना जागेची पाहणी करावयास सांगितली तहसीलदार साहेबांनी ठेकेदारास आठ दिवसात काम पूर्ण करण्याचे आदेश दिले त्यावेळी आठ दिवस सातत्याने पिचड साहेब स्वतः कलेक्टरांशी संपर्क साधत होते आणि सर्व व्यवस्था मार्गी लावण्याचे काम करत होते.
काही दिवसापूर्वी तालुक्याचे आमदार लहामटे यांना ही बातमी समजली व त्यांनी लगेचच गायकर साहेबांच्या समवेत अगस्ती आश्रम येथे कोविड सेंटरची पाहणी केली .काम चालू आहे या ठिकाणी बघितल्यानंतर त्याने लगेचच दोन दिवसांमध्ये ह्या कामाचा शुभारंभ करण्याचे ठरवले. नेहमीप्रमाणे लगेच आमदार साहेबांनी पेपरला बातमी आणि मीडियात बातमी दिली की शुक्रवार 16 एप्रिल रोजी कोविड सेंटरचे उद्घाटन होईल असे ठरवले ते म्हणतात ना ” काम दहा हजाराचे अन गप्पा दहा करोडच्या ” अश्या प्रकारे आपली जनता गोळा करून आमदार साहेबांनी श्रेयाच्या अपेक्षेपोटी काम पुरे नसतानाही , अजून साधे शंभर वेळीही लावलेले नाहीत अपूर्ण काम असतानादेखील श्रेयासाठी 16 एप्रिल रोजी लगेच उद्घाटन करून टाकले . तालुक्याचे लोकप्रतिनिधी कोविड सेंटर च्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहणार समजल्यानंतर तालुक्याचे तहसीलदार मा.मुकेश कांबळे व नगरपंचायत मुख्याधिकारी जगदाळे साहेब यांनाही हजर राहावे लागले. ह्यावेळी राजकारण मागे ठेवता माजी मंत्री पिचड साहेब व माजी आमदार वैभव पिचड यांना आमंत्रित करणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही कारण प्रशासनाचे हात बांधले गेले असे माझ्यासारख्याला वाटते . स्वतःच्या प्रतिष्ठेला पेटलेली जनता व श्रेयासाठी लढणारे सांगतात की चाळीस वर्ष पिचड साहेबांनी काय केले ? त्यांना तालुक्याची पार्श्वभूमी समजून सांगायला पाहिजे असे माझ्यासारख्याला वाटते .
राजूर येथे शासकीय वस्तीगृह पिचड साहेबांच्या कालावधीमध्ये झाले त्याठिकाणी साहेबांनी कोविड सेंटर सुरू केले .अकोले येथील खानापूर या ठिकाणी शासकीय आश्रम सुरू झाले तेही माजी मंत्री मधुकर पिचड साहेब आदिवासी मंत्री असताना उभे राहिले त्याठिकानी कोविड सेंटर झाले .
bio disel,बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
पिंपरकणे चा पूल असेल कोतूळ चा पुल असेल या देवठाण येथील अरुण शेळके यांच्या पाठपुराव्यातून 5 कोटी रुपयाची शासकीय रुग्णालयाची वर्क ऑर्डर नसतानाही नूतन आमदारांनी त्याचा सहा महिन्यापूर्वीच नारळ फोडला . नंतर वर्क ऑर्डर आल्यानंतर मा.आ.वैभवभाऊ पिचड यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ झाला . ही सर्व कामे पिचड यांनीच मंजूर केलेले आहेत . आजही अकोल्यातील अगस्ति आश्रम येथे कोविड सेंटर झाले हे भक्तनिवास हे तीर्थक्षेत्र विकास या योजनेतून पिचड साहेबांच्या सहकार्यानेच झालेले आहे . अकोले तालुक्याच्या तिन्ही बाजूने पाणी अडविण्याचे काम पिचड साहेबांनी केले परंतु श्रेयापोटी पिंपळगाव धरणाचे पाणी सोडण्याचे काम डॉ.लहामटे यांनी केले त्यापोटी शेतकऱ्यांना 25 कोटी रुपयांचा तोटा सहन करावया लागणार आहे हे कोण बोलणार ?