maha board ssc result 2025 दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी good news

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

maha board ssc result 2025 दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी good news

maha board ssc result 2025 इयत्ता दहावीचा निकाल मंगळवार दिनांक 13 रोजी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कळवले आहे. 

फेब्रुवारी मार्च 2025 या वर्षात झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निकाल दिनांक तेरा मे रोजी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. या संदर्भात मंडळांनी ही माहिती उपलब्ध करून दिली आहे.

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

निकाल कुठे पाहावा

अधिकृत संकेतस्थळाचे पत्ते पुढीलप्रमाणे 

https://results.dglocker.gov.in

Https://sscresult.mahahscboard.in

Https://sscresult.mkcl.org

ऑनलाइन निकालानंतर माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी संपर्क करून केलेल्या गुणांची गुण पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागाकडे मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा शाळा मर्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे

. गुण पडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार दिनांक 14 5 2025 ते बुधवार दिनांक 28 5 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. 

फेब्रुवारी मार्च 2025 च्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुण सुधार साठी आवेदन करण्याचे असतील त्यांना लगतच्या तीन संधी जून जुलै 2025 फेब्रुवारी मार्च 2026 आणि जून जुलै 2026  सर्व विषयांसह प्रविष्ट होण्यासाठी संधी उपलब्ध असेल.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles