76 व्या प्रजासत्ताक दिन शानदार सोहळयात संपन्न
बीड,
beed Republic day celebration बीड जिल्ह्यात अधिकाधिक सर्वांगीण विकास कामे करून विकसित बीड जिल्हा अशी ओळख प्राप्त करून देण्याचे नियोजन आहे. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केले.
पोलीस मुख्यालय मैदानावर 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा श्री भरणे यांच्या हस्ते पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या दिमागदार सोहळ्यात पोलिसदलासह होमगार्ड, एन.सी.सी. तसेच स्काऊट गाईड आदींच्या 19 पथकांनी संचलन केले. या परेडचे नेतृत्व बीडचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी केले. ध्वजारोहणा नंतर भरणे यांनी परेडची पाहणी केली. आपल्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.