बीड,दि.26 फेब्रुवारी, प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांच्यावतीने कोव्हिड
-19 लसीकरण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान
राज्यभर राबविण्यात येत आहे. आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यात बहुमाध्यम जनजागृती अभियानाची सुरुवात
येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून तसेच फित कापून
उद्घाटन करण्यात केले.
आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांना देण्याचे अमुल्य कार्य या जनजागृती
अभियानातून केले जाणार आहे. तसेच एलईडी डिस्प्ले बहुमाध्यम जनजागृती च्या माध्यमातूनही संदेश दाखविण्यात येणार आहेत. श्राव्य
संदेशाचाही समावेश या चित्ररथात करण्यात आला आहे.
बहुमाध्यम जनजागृती
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, जिल्हा शल्यचिकित्सिक डॉ. सूर्यकांत गिते, अतिरीक्त जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ तांदळे, डॉ संजय कदम , डॉ. पी. के इंगळे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे
गिरीष मोहेकर, जिल्हा माहिती कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी किरण वाघ, पर्यवेक्षक ना. गो. पुठठेवाड
यांची उपस्थिती होती.
क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो अहमदनगरचे प्रभारी प्रचार अधिकारी पी,फणिकुमार यांनी या अभियानाबाबतची सविस्तर माहिती
यावेळी दिली. पुढील दहा दिवस बीड जिल्ह्यातील बीड, पाटोदा, आष्टी,शिरुर-कासार, गेवराई, माजलगाव, वडवणी, धारुर
व केज या तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरीभागातून या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे
असे सांगून याचा लाभ सर्व जनतेनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हयात 9 तालुक्यात कार्यक्रम होणार असून याद्वारे कोरोना लसीकरण मोहिमेला चालना मिळेल. या बहुमाध्यम
चित्ररथामध्ये शाहीर दिलीप शिंदे & पार्टी आणि समता कला पथक, बीड यांच्याद्वारे गीत व नाटक सादरीकरणाच्या
माध्यमातून कोरोना लसीकरण, आत्मनिर्भर भारत , शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची जनजागृती करण्यात येणार
आहे. या प्रचार मोहिमेचा मुळ उद्देश हा लोकांपर्यत लसीकरण मोहिमेची खरी माहिती देऊन त्यांचा संभ्रम दूर करणे हा
आहे.
आणखी वाचा:पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पुण्यातील लष्कर कोर्टात खाजगी खटला दाखल
[…] […]