जामखेड दि 26 फेब्रुवारी,प्रतिनिधी
अफूची शेती म्हटली कि भल्या भल्यांना घाम येतो.राज्यात अफू शेती करण्यावर कायद्याने प्रतिबंध असूनही काही शेतकरी गुपचूप शेती करतात.अशीच अफूची शेती करण्याच्या शेतकऱ्याला थेट जेलची हवा खावी लागली आहे. जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील काळे वस्तीवरील अफूच्या शेतीवर पोलिसांनी छापा टाकून शेतात लावलेली 1 लाख 70 हजारांची 56 किलो वजनाची झाडे जप्त केली. अफूची लागवड केलेल्या शेतकऱ्याला अटक करण्यात आली.ही कारवाई जामखेड पोलिसांनी केली.
काळे वस्तीवरील अफूच्या शेतीचा जामखेड पोलीसांना वास लागला. हा वास खरा आहे का याची पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी खात्री केली. त्यानंतर आपल्या पथकासह प्रत्यक्ष त्या ठिकाणी छापा टाकून शेतात लावलेली 56 किलो वजनाची झाडे जप्त केली. याची किंमत 1 लाख 70 हजार इतकी आहे.वासुदेव महादेव काळे रा. काळे वस्ती, जातेगाव असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याने आपल्या शेतात अफूच्या झाडांची लागवड केली होती.
हेही वाचा व्यापाऱ्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने अँटीजेन चाचण्यांचा कॅम्प गुंडाळला
या कारवाईत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह पो. हे कॉ संजय लाटे, संदिप आजबे, संग्राम जायभाय, आबासाहेब आवारे, विजय कोळी, सचिन पिरगळ, संदिप राऊत, अविनाश ढेरे सहभागी झाले होते.
आरोपी वासुदेव महादेव काळे रा. काळे वस्ती, जातेगाव याने त्याच्या मालकीच्या गट नंबर 1077 मधिल शेतात 56 किलो वजनाची हिरव्या रंगाची बोंडे व पाने असलेली 1 लाख 69 हजार 815 रुपये किंमतीची अफुची झाडे लावली असल्याचे आढळून आले. सर्व झाडे जप्त केली असुन आरोपीस अटक केली आहे.
जामखेड पोलीस स्टेशन चे पो.हे.कॉ संजय लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी वासुदेव महादेव काळे याच्या विरोधात अमली औषधे द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम सन 1985 च्या कलम 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे करत आहेत.
[…] आणखी वाचा:अफूचा वास पोलिसांना आला अन.श… […]