कडा
kada good news कडा परिसरातील नागरिकांसाठी खुशखबर असून देवी निमगाव येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे कडा परिसरातील नागरिकांचापाण्याचा प्रश्न आणि शेतीचा प्रश्न सुटला आहे.
दरवर्षी कडा परिसरातील देवीनिमगाव चा तलाव भरण्याची अपेक्षा असते.हा तलाव भरण्यासाठी सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंतची वाट पहावी लागते मात्र यावर्षी हा तलाव लवकरच भरल्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
आष्टी तालुक्यातील धामणगाव परिसरात आणि डोंगर पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने त्या भागातून वाहणाऱ्या नद्या आणि ओढे हे देविनिमगाव तलावाला येऊन मिळतात.हा देवीनिमगाव तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे .सध्या तलावाच्या सांडव्यावरून पाणी सुरू असून कडी नदीला स्वच्छ पाण्याचा प्रवाह सुरू आहे.त्यामुळे नागरिक सुखावले असून या नदीवर खाली असलेल्या चौभा निमगाव तलावामध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे.या पाण्याचे पूजन कडेकरांनी आज केले.