आष्टी,
aam aadmi parti ashti आम आदमी पार्टी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाची आढावा बैठक शनिवार, २७ जुलै रोजी घेण्यात आली. महाराष्ट्रातील येणाऱ्या विधानसभेसाठी पक्षाने सर्व २८८ जागांवर लढण्याचा निर्धार केला असून, त्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत आगामी विधानसभेच्या तयारीची आणि रणनीतीची सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस आप बीड जिल्हाध्यक्ष अशोक येडे, आप आष्टी तालुका अध्यक्ष डॉ. महेश नाथ, जिल्हा सचिव रामधन जमाले, शिरूर तालुका अध्यक्ष अस्मान जरांगे, सुहास चौधरी, ऍड. सोमनाथ राक्षे, बाळासाहेब मोरे, बाळासाहेब ढाकणे, बाबाबुराव धवन, जालिंदर ठोंबरे, अंबादास चव्हाण, विष्णू गिरी, मनोज विधाते, देविदास मोरे, अंबादास नरुटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत पक्षाच्या आगामी योजना, प्रचार रणनीती आणि कार्यकर्त्यांच्या भूमिका यावर सखोल विचारविनिमय करण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांमध्ये आम आदमी पार्टीचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि विजय सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना ठरविण्यात आल्या.
[…] आम आदमी पार्टी आष्टी येथे आढावा बैठक स… […]