नारीशक्तीने पॅरिस ऑलम्पिक मध्ये केली कांस्यपदकाने सुरुवात

- Advertisement -
- Advertisement -

भारताच्या मनू भाकरला महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक.

गौरव डेंगळे

पॅरिस ऑलम्पिक : भारतीय नेमबाज मनू भाकरनं इतिहास रचला आहे. मनूनं महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकलं.भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज आहे.

मनू भाकरचं हे दुसरं ऑलिम्पिक आहे. तिनं शेवटच्या टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदार्पण केलं होतं, परंतु १० मीटर एअर पिस्तूल पात्रता फेरीत तिचं पिस्तूल खराब झालं. यामुळे तिला मागच्या वेळी पदक जिंकता आलं नव्हतं.मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २२१.७ गुणांसह कांस्यपदक जिंकलं. अंतिम फेरीत मनूनं सुरुवातीपासून तिसरं स्थान कायम राखलं. या स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य पदकं दक्षिण कोरियाच्या दोन खेळाडूंनी जिंकली. ओ ये जिननं २४३.२ गुणांसह सुवर्णपदक जिंकलं तर किम येजीनं २४१.३ गुणांसह रौप्य पदक जिंकलं.मनू भाकरनं पात्रता फेरीतही तिसरं स्थान पटकावले होतं.

नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. यासह तिनं नेमबाजीत भारताचा १२ वर्षांचा पदकांचा दुष्काळही संपवला. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंग आणि विजय कुमार यांनी नेमबाजीत पदकं जिंकली होती.

२२ वर्षीय मनू भाकरनं पॅरिस २०२४ ऑलिम्पिक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल, १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक आणि महिलांच्या २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत भाग घेतला आहे.२१ सदस्यीय भारतीय नेमबाजी संघातील ती एकमेव ॲथलीट आहे जी इतक्या वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेत आहे.२०२३ आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात पाचव्या स्थानावर राहून मनूनं भारतासाठी पॅरिस २०२४ ऑलिम्पिक कोटा मिळवला होता.

ISSF विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी मनू भाकर ही सर्वात तरुण भारतीय आहे. गोल्ड कोस्ट २०१८ मध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत ती कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन देखील आहे.

हरियाणातील झज्जर येथे जन्मलेल्या मनू भाकरनं शालेय जीवनात टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. याशिवाय तिनं ‘थान टा’ नावाच्या मार्शल आर्टमध्येही भाग घेतला, ज्यातं तीनं राष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकली आहेत. बॉक्सिंगदरम्यान मनूच्या डोळ्याला दुखापत झाली, त्यानंतर तिचा बॉक्सिंगमधील प्रवास संपला.

पण मनूला खेळाची वेगळी आवड होती, त्यामुळे ती एक उत्कृष्ट नेमबाज बनण्यात यशस्वी झाली.रिओ ऑलिम्पिक २०१६ नुकतंच संपलं असताना मनूनं वयाच्या १४ व्या वर्षी नेमबाजीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आठवडाभरात तिनं वडिलांना शूटिंग पिस्तूल आणायला सांगितलं. यानंतर वडील राम किशन भाकर यांनी तिला बंदूक विकत घेऊन दिली. याच निर्णयानं मनू भाकरला ऑलिम्पियन बनवलं.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe

Latest Articles