लिस निरीक्षक श्रीमती शबाना शेख यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
अकोले , दि.२४ फेब्रुवारी, प्रतिनिधी
अकोलेच्या सुकन्या व डोगरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीमती शबाना शेख यांनी उल्लेखनीय कार्य करत मुंबईत त्यांनी व त्यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मुंबईत अंमली पदार्थ ( एम.डी मेफेड्रॅान)विक्री करणारी व पुरवणारी टोळी पकडून त्यांचे कडून सुमारे १२ कोटी ५० लाख रूपयांचा अंमली पदार्थाचा साठा पकडला.या धडक कारवाई मुळे मूळच्या अकोलेतील असलेल्या शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अकोले शहरातील स्व.शब्बीरभाई शेख यांच्या कन्या असलेल्या व कवयित्री शिक्षिका दिलशाद सय्यद यांच्या भगीनी श्रीमती शबाना शेख या डोगरी पोलिस ठाण्यात वरीष्ठ पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.अतिशय कडक व शिस्तप्रिय स्वभावाच्या शेख यांनी पोलिस दलात काम करताना अनेक उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.पोलीस दलातील त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीवर अकोलकर खुश आहेत.
नुकतीच अप्पर पोलिस आधिक्षक दक्षिण विभाग,मुंबई श्री सत्य नारायण, पोलिस उप आयुक्त परीमंडळ १ मुंबई शशिकुमार मिना, सहाय्यक पोलिस आयुक्त डोंगरी विभाग अविनाश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली डोगरी पोलिस निरीक्षक श्रीमती शबाना शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने डोगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १८ फेब्रुवारी २०२१ रोजी इसाक. इकबाल हुसेन सय्यद या आरोपीस १२ ग्रॅम अमली पदार्थ (एम.डी.मेफेड्रॅान) सह पकडुन गुन्हा दाखल केला अधिक तपास करुन शिताफीने अमली पदार्थ पुरवणारा अब्दुल वसीम अब्दुल अजिज शेख व दिपक संजीवा बगेरा यास पकडले व दिपक बगेरा याच्या कलीना येथील राहत्या घरातून मोठ्या अमली पदार्थाचा साठा हस्तगत करण्यात आला .यावेळी तब्बल २५ किलो.ग्रॅम एम.डी ( मेफेड्रॅान) इतका अमली पदार्थ साठा ज्याची किंमत १२ कोटी ५० लाख रुपये व रोख रक्कम ५ लाख रुपये,तसेच इतर साहित्य हस्तगत करुन मोठी कारवाई केली आहे.या यशस्वी व धाडसी कारवाई बद्दल वरीष्ठ पोलिस निरीक्षक शबाना शेख यांचा अप्पर पोलिस आधिक्षक दक्षिण विभाग,मुंबई श्री सत्य नारायण, पोलिस उप आयुक्त परीमंडळ १ मुंबई शशिकुमार मिना, सहाय्यक पोलिस आयुक्त डोंगरी ,विभाग अविनाश शिंगटे यांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे.त्याच्या या कामगिरीची अकोले करांना सोशल मिडिया द्वारे माहिती मिळताच तालुक्यासह शहरातून त्यांचेवर फोन,व्हाटसअप ,फेसबुक व इतर सोशल मिडियाद्वारे अभिनंदन केले जात आहे.श्रीमती शबाना शेख यांच्या पोलिस दलातील धडक कारवाई बद्दल अकोले करांना नेहमीच अभिमान राहील अशी भावना अनेक सामाजिक कार्यकर्तेनी व्यक्त केली तर अकोले तालुका पञकार संघाचे वतिनेही त्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
हेही: जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढतेय;आज 159 ने वाढ