Homeताज्या बातम्याकडा नदीवरचा पूल वाहून गेला; वाहतूक बंद

कडा नदीवरचा पूल वाहून गेला; वाहतूक बंद

कडा

The bridge over the Kada River was swept away; traffic stop जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने बीड अहमदनगर राष्ट्रीय महामार्गांवरील तात्पुरता केलेला पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली.


राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या वतीने अहमदनगर कडा जामखेड बीड या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. कडा येथे कडी नदीवरील जुना पूल तोडून नवीन पूल बांधकाम सुरु होते. या रस्त्यावरील वाहतूक तात्पुरत्या पुलावरून वळविण्यात आली होती.मात्र काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने कडी नदीला पूर आला. या पुराच्या जोरदार प्रवाहने हा पूल वाहून गेला. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक पूर्ण बंद झाली आहे.या भागातील नागरिकांनी हा पूल पावसाळ्यापूर्वी करावा अशी मागणी नागरिकांनी केली होती ,मात्र धिम्या गतीने होत असलेल्या या कामामुळे आता पूर्ण रस्ता बंद झाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments