बीड दि 21 फेब्रुवारी, प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात कोरोना चा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज बीड जिल्ह्यामध्ये 53 कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.
बीड जिल्ह्यात आज 419 रुग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यापैकी 366 रुग्ण हे निगेटिव्ह आढळून आले आहेत तर 53 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहे बीड जिल्ह्यातील 13 तालुक्यात पैकी काही तालुक्यातून हे निरंक असल्याचे आढळून येत आहे मात्र दिवसेंदिवस या कोरोनाच्या आकडा हा वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे.
बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये किती संख्या
आंबेजोगाई 19 आष्टी 1 बीड 16 धारूर 1 गेवराई 1 केज 3 परळी 5 पाटोदा 1 शिरूर 6 अशा एकूण 53 रुग्णांची आज नोंद झाली. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 18 हजार 416 इतक्या कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. तर जिल्ह्यात 573 व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह होण्याचा रेट हा 13.1 पर्यंत वाढला आहे.
हेही वाचा:चालकामार्फत 67 हजारांची लाच घेताना उपविभागीय अधिकारी जाळ्यात
[…] हेही वाचा: बीड जिल्ह्यात किती वाढला को… […]