अडीच लाखांची लाच घेताना आरोग्य अधिकारी रंगेहात एसीबीच्या जाळ्यात

- Advertisement -
- Advertisement -

 

अहमदनगर दि १७ फेब्रुवारी, प्रतिनिधी

अडीच लाखाची रुपयांची  लाच घेताना अहमदनगर महानगरपालिकेचे  आरोग्य अधिकारी नरसिंह सर्वोत्तमराव पैठणकर वय 47 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

अहमदनगर शहरातील तक्रारदार यांचे अहमदनगर महानगरपालिका येथे मृत जनावरांच्या दाहिनी चा प्रोजेक्ट असून त्या प्रोजेक्ट संदर्भात निरी पर्यावरण विषयक संस्थेने त्रुटी काढल्या आहेत. असे सांगून त्या दूर करून तक्रारदार यांचे राहिलेले बिल काढण्यासाठी या अधिकाऱ्यांनी पाच लाख रुपये लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तडजोडी अंती पंचासमक्ष अडीच लाखाची रक्कम  देण्याचे ठरले.

हेही वाचा:मुलींमध्ये पुणे विभागाला तर मुलांमध्ये मुंबई विभागाला विजेतेपद

त्यानंतर आज या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंध प्रतिबंधक विभाग नाशिकचे अधिकारी पोलीस निरीक्षक किरण एच रासकर यांनी सावेडी कचरा डेपो अहमदनगर येथे पंचांसमक्ष अडीच लाख रुपयांची लाच घेताना पकडले.

या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक मृदुला एम नाईक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, पोलीस पोलीस हवालदार मोरे, पोलीस हवालदार गोसावी, पोलीस हवालदार कुशारे,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी ही कारवाई केली.

Related Articles

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles