औरंगाबाद दि 16 फेब्रुवारी, प्रतिनिधी
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने शंतनू मुळूक यास 10 दिवसाचा ट्रान्झिट अग्रिम जामीन मंजूर केला आहे, परंतु निकिता जेकब यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलना आडून हिंसाचार पसरवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टूलकिट प्रकरणी बीड येथील पर्यावरणवादी कार्यकर्ता शंतनू मुळूक यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल झाला असून दिल्ली पोलीस तपासा साठी बीड मध्ये दाखल झाले आहेत.
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू या तिघांनी टूलकिट दस्ताऐवज तयार केले होते. त्याच्या आडून हिंसाचार पसरविण्याचे काम होणार असल्याच्या कारणाने दिल्ली पोलिसांनी स्पेशल सेल गुन्हा रजिस्टर नंबर 49/2021 कलम 124,153(अ) भादवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शंतनू मुळूक यास अग्रीम जामीन मंजूर केला आहे.
हेही वाचा: शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा; यामध्ये काय चुकीचं-हेमलता मुळूक
[…] […]