शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा; यामध्ये काय चुकीचं-हेमलता मुळूक
बीड दि 15 फेब्रुवारी, प्रतिनिधी
शंतनू हा पर्यावरणावर काम करणारा मुलगा आहे.त्याने शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता यामध्ये काय चुकीचं आहे असा परखड सवाल शंतनूची आई हेमलता मुळूक यांनी केला आहे.
दिल्ली येथे शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये बीडमधील शंतनू मुळूक या युवकाचे नाव सध्या चर्चेला जात आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांची टीम बीड मध्ये चौकशी करत आहे. त्यांनी या शंतनू मुळक या युवकाच्या आईवडिलांची चौकशी केल्याचे पुढे आले आहे.
यासंदर्भात बोलताना शंतनूची आई हेमलतामुळूक यांनी सांगितले की, शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता यामध्ये काय चुकीचं आहे.
आणि आम्ही दोघेही या शंतनू सोबत आहोत असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याबाबत माहिती देताना शंतनूचे वडील शिवलालमुळूक यांनी सांगितले की, शंतनू सात तारखेला बीडमध्ये लग्नाला आला होता.त्यानंतर तो परत गेला तेव्हापासून आजपर्यंत त्याच्याशी बोलणे झालेले नाही.तसेच 12 तारखेला दिल्ली पोलिसांची टीम पहाटे पाच वाजता घरी आली होती. त्यांनी आम्हाला आमच्याकडे शंतनू संदर्भात चौकशी केली यामध्ये आम्ही या दिल्ली पोलिसांच्या टीमला संपूर्ण सहकार्य केले असून त्याच्या त्यानंतर ते मला औरंगाबाद येथे घेऊन गेले तेथे ही चौकशी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा:टूलकिट प्रकरणी बीडच्या शंतनू मुळूक वर दिल्ली येथे गुन्हा दाखल
[…] […]