गेवराई
dhananjay munde with pankaja munde gevrai भाजप आणि महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र येऊन लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. यापूर्वी मंत्रीपदाच्या कार्यकाळात मी कायम विकासाला केंद्रबिंदू ठेवले कधीच सुडाचे राजकारण केले नाही की, कोणाला त्रास दिला नाही. देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजी विराजमान होणार आहेत. त्यामुळे beed loksabha matdar sangh बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तुम्ही सर्वजण मला प्रचंड मताधिक्यांनी विजयी कराल हा विश्वास आहे. जिल्ह्याचा विकास हाच माझा ध्यास आहे असे प्रतिपादन पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केले.
लोकसभा निवडणूक ही, स्वाभिमानाची लढाई जिंकण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना सर्वाधिक मतांनी निवडून आणणे हा आपल्या सर्वांच्या स्वाभिमानाचा मुद्दा आहे, त्यामुळे प्रचंड मताधिक्याने पंकजाताई मुंडे यांना निवडून द्या असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. दिलेला शब्द पाळायचा ही पंडित आणि शिवछत्र परिवाराची परंपरा आहे. गेवराई तालुक्यातील 14 प्रकल्प येत्या एक वर्षात पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून मार्गी लागावेत ही अपेक्षा आहे असे झाले तर मुंडे परिवाराचे गेवराई तालुक्यावर खूप मोठे कर्ज राहील असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. दरम्यान भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना बीड जिल्ह्यात गेवराई मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्य आम्ही मिळवून देऊ असा विश्वास बीड जि प चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केला.
पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आज शहरात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी व्यासपीठावर कृषिमंत्री धनंजय मुंडे, उमेदवार पंकजाताई मुंडे, माजी आ. अमरसिंह पंडित यांच्यासह अनिल तुरुकमारे, परमेश्वर वाघमोडे, मीनाक्षी पाटील, मुजीबभाई पठाण, सुनील पाटील, शरद चव्हाण, फुलचंद बोरकर, कुमारराव ढाकणे, विकास सानप, जगन्नाथ शिंदे, सुभाष नागरे, श्रीराम आरगडे, छगन पाटील आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, माझी निवडणूक तुम्हा सर्वांनी हाती घेतली आहे याचा मनोमन आनंद आहे. बीड जिल्ह्याचे भवितव्य घडवण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. असून जिल्ह्यातील जनता विकासाच्या मुद्यावर आपल्या पाठीशी राहील. धनंजय मुंडे, अमरसिंह पंडीत, विजयसिंह पंडीत हे सर्वजण पंकजाताई लोकसभेच्या उत्तम उमेदवार आहेत हे सांगत माझ्यासाठी मत मागत आहेत. माझ्या प्रचाराची जबाबदारी तुम्ही सर्वजण खांद्यावर घेऊन ती यशस्वीरित्या पार पाडत आहात हे माझ्यासाठी खूप महत्वाचे प आहे असे सांगत त्या म्हणाल्या, पालकमंत्री म्हणून काम करत असताना मी कायम विकास केंद्रबिंदू ठेवले. माझ्या विरोधकांनाही मी कधीच त्रास दिला नाही की भेदभाव केला नाही. ही निवडणूक बीड जिल्ह्याचे भवितव्य ठरवणारी आहे, त्यामुळे तुम्ही सर्वजण मोठ्या मताधिक्याने मला निवडून द्या असे आवाहन यावेळी पंकजाताई मुंडे यांनी केले.
*धनंजय मुंडे*
पालकमंत्री धनंजय मुंडे यावेळी म्हणाले, हा मेळावा अभूतपूर्व ठरला आहे. पंकजाताई मुंडे यांना विधानसभा आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केल्याचा प्रदीर्घ अनुभव आहे, अशावेळी आपला विरोधी उमेदवार आता दुसऱ्या स्थानावर राहतो की तिसऱ्या हे लवकरच कळणार आहे. अमरसिंह पंडित यांनी मला ‘कायम कृषी मंत्री राहो’ अशा शुभेच्छा मला दिल्या आहेत असे सांगत धनंजय मुंडे म्हणाले, राज्याचा कृषिमंत्री म्हणून मला हेही बघावे लागेल की, आपला विरोधी उमेदवार नेमका कशाची शेती करतो आहे? अमरसिंह पंडित यांनी विकासाची ब्लू प्रिंट त्यांच्या भाषणातून मांडली आहे. महायुतीतील घटक पक्ष आता पंकजाताई मुंडे यांच्या विजयासाठी एक दिलाने काम करत आहेत. अशा स्थितीत दुसरीकडे अपप्रचार करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी येत्या 13 तारखेला कमळ या चिन्हासमोर बटन दाबून भाजप महायुतीचे उमेदवार पंकजाताई मुंडे यांना मोठ्या मताधिक्याने आपण संसदेत पाठवा. पंतप्रधान किसान सन्मान योजना राबवताना केंद्र सरकारने कधीच भेदभाव केला नाही, मात्र तरीही आता संसदेचे प्रतिनिधी निवड देण्यासाठीच्या या निवडणुकीत काही जणांकडून बुद्धिभेद करून संभ्रम निर्माण केला जातोय, त्यातून काही साध्य होणार नाही. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच पुढे गेली पाहिजे.ही देशाची निवडणूक आहे. मुंडे परिवाराने कायम विकासाचे राजकारण केले असून शिवछत्र परिवार दिलेला शब्द पाळते याचा मला विश्वास आहे, त्यामुळे अपप्रचाराकडे दुर्लक्ष करून आपल्या उमेदवार पंकजाताईंना सर्वाधिक मताने निवडून आणणे हा आपल्या सर्वांच्या स्वाभिमानाचा मुद्दा असून त्यासाठीच आपण प्रचंड मताधिक्य मिळवू देऊ असे धनंजय मुंडे म्हणाले.
*अमरसिंह पंडित*
यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित म्हणाले, ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही ओळख आता आपल्याला बदलायची आहे. पंकजाताई मुंडे यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करावे यासाठी आम्ही सर्वजण त्यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देऊ. दिलेला शब्द पाळायचा ही आमची शिवछत्र परिवाराची परंपरा आहे. या निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांच्या विजयासाठी मतदारसंघातील प्रत्येक घराच्या चौकटीपर्यंत जाऊन मत मागील असे ते म्हणाले. पंकजाताई मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील पाणीसाठा वाढण्यासाठी चकलंबा, पाचेगाव, जातेगाव आदी ठिकाणचे १४ प्रकल्प येत्या एक वर्षात मार्गी लावावेत हे प्रकल्प मार्गी लागल्यास गेवराई तालुक्यातील तब्बल ३० हजार एकर जमीन कायमस्वरूपी पाहण्याखाली येईल असे झाले तर धनंजय मुंडे हेच महाराष्ट्राचे कायम कृषी मंत्री राहतील तसेच पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे परिवाराचे गेवराई तालुक्यावर हे मोठे कर्ज राहील आम्ही तुमचे कायम आभारी आहोत. ही निवडणूक जातीपातीच्या पलीकडची आहे. पंकजाताई मुंडे यांचा विजय निश्चित आहे असे ते म्हणाले.
*पंकजाताईंना सर्वाधिक मताधिक्य देणार*
कार्यकर्ता मेळाव्यात विजयसिंह पंडित म्हणाले, गेवराई मतदार संघातून जिल्ह्यात पंकजाताई मुंडे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊ.आम्ही सर्वजण लढणारे आहोत, मागे हटणारे नाहीत.देशात पुन्हा एकदा मोदीजींचे सरकार येणार हे निश्चित आहे, त्यामुळे बीड जिल्ह्यातून आपल्याला पंकजाताई मुंडे यांना सर्वाधिक मतांनी निवडून द्यायचे आहे, त्यासाठी अंग झटकून सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आपल्या एकजुटीतूनच पंकजाताई मुंडे यांचा ऐतिहासिक विजय होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
[…] पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देणं हा… […]