कितीही भाषण ठोकले आणि कितीही आमरण उपोषण केले तरीही कायदा बदलत नसतो…पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे
निवडणुक हे महायुद्ध आहे..म्हणूनच मला यात टाकलं..
मला दिल्लीत जायचे ही हाऊस आली म्हणून मी निवडणूक लढवत नाही
जाटनांदूर,
Pankaja munde on manoj jarange ज्या गोष्टी तुम्हाला कायद्याने मिळणार आहेत त्यात राजकारण आणण्याचं काहीही कारण नाही.. मी कितीही भाषण ठोकले आणि कितीही आमरण उपोषण केले तरीही कायदा बदलणार नाही.. कायद्याच्या गोष्टी मिळणार आहेत त्याच्यामध्ये या निवडणुकीत राजकारणाचे कारण नाही.. अस वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.. त्या बीडच्या जाटनांदूर येथिल प्रचार सभेत बोलत होत्या..
पुढे बोलताना एखाद्याला एकदा शब्द दिला तर मान कापून दिली तरी शब्द बदलत नाही..स्त्रियांमध्ये देखील शौर्य असतं.. शौर्यां बरोबर धैर्य असत. आजची निवडणुक हे महायुद्ध आहे..म्हणूनच मला यात टाकलं..रथी महारथी आहेत..ही निवडणुक बीड जिल्ह्याचा अस्मितेची आहे…
मला दिल्लीत जायचे ही हाऊस आली म्हणून मी निवडणूक लढवत नाही आणि मला निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी द्यावी यासाठी कुठलाही पत्र घेऊन कुठल्याही नेत्याच्या दारात गेले नाही..
मी उमेदवारी मागण्यासाठी कोणत्याही नेत्याच्या घरी गेले नाही..
बीड जिल्ह्याची जनता विकासाच्या पाठीशी राहील.. मोदीजी म्हणून हाक मारली तर बोल पंकजा असं उत्तर मिळेल आणि त्यातून विकास होईल यासाठी ही निवडणूक महत्त्वाची..माझ्या दारात आलेलया व्यक्तीची जात आणि आडनाव विचारणार नाही..ही अस्मितेच्या यासाठी आहे की अशी संधी पुन्हा जिल्ह्याला येणारच नाही..माझ्या हातात तराजू आहे ज्याच्या हातात तराजू असते त्याच्या डोळ्यावर पट्टी असते.. पण माझ्या डोळ्यावर पट्टी नाही..मला काही मिळवायचं नाहि… मला कशाची कमी नाही..जिल्ह्याचा चेहारा मोहरा बदलायला लागला… जिल्हाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी साथ द्या अस आव्हान पंकजा मुंडे यांनी केलं..