बीड लोकसभेसाठी या नेत्याने केला उमेदवारीचा दावा

- Advertisement -
- Advertisement -

अंबाजोगाई,

Beed LokSabha Constituency ncp candidate बीड जिल्ह्यात महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित होणे अजून बाकी आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. यातच राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातील कार्यकर्ते बजरंग सोनवणे यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्यानंतर उमेदवारी कोणाला मिळणार याबाबद्द्ल चर्चा झडत आहेत.

आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्याच्या वतीने अंबाजोगाई शहरात प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आज केज आणि अंबाजोगाई कार्यकर्ते, पदाधिकारी यांची समविचार बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये लोकसभेची उमेदवारी नरेंद्र काळे narendra kale ncp याना देण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. यावेळी  या बैठकीला केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, नरेंद्र काळे यांच्यासह केज, अंबाजोगाई शहर, तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थिती होते.

मराठा आरक्षण गावबंदीचा भाजपचे नेते नंदकिशोर मुंदडा यांना फटका

यावेळी बोलताना नरेंद्र काळे यांनी आपल्या उमेदवारीचा दावा केला. तसेच माजी आमदार साठे यांनी याबाबत ची भूमिका मांडून काळे योग्य उमेदवार असल्याचे सांगितले.

यावेळी केलेल्या ठरावात म्हटले आहे कि, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मानणाऱ्या आणि अनेक वर्षापासून पक्षात काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी.तसेच यापूर्वी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची निवड कायम  मुदत संपेपर्यंत कायम ठेवाव्यात असा ठराव करण्यात आला आहे.

आता यापूर्वी चर्चेत असलेले नरेंद्र काळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles