अंगणवाडी ताजी बातमी :राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अंगणवाडी गटात दौलवडगावच्या श्रीमती यास्मिन आलम खान द्वितीय

- Advertisement -
- Advertisement -

आष्टी,

state innovation scert pune महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अंगणवाडी गटात आष्टी तालुक्यातील कोहक वस्ती दौलावडगाव येथील  यास्मिन आलम खान यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

या स्पर्धात्मक उपक्रमासाठी शालेय शिक्षण विभागाने महिला बालकल्याण विभागातील अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांचा समावेश केला होता.
यासाठी अंगणवाडी सेविका यास्मिन आलम खान यांनी  हसत खेळत अंकज्ञान हा नवोपक्रम सादर केला होता. या नवोपक्रमास पूर्व प्राथमिक गट अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका या गटातून द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

आणखी वाचा :बीड जिल्ह्यातील भाविकांसाठी खुशखबर.आता बीडहुन अयोध्या प्रयागराज अन काशीला एसटी बस.

नुकत्याच  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला.  उपसंचालक डॉक्टर कमलादेवी आपटे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संचालक राहुल रेखावर, सहसंचालक शोभा खंदारे, विभाग प्रमुख डॉ दत्तात्रय थिटे उपस्थित होते. या नवोपक्रमासाठी यास्मिन आलम खान यांना एकात्मिक बाल विकास  प्रकल्प अधिकारी अंजली वाघमारे यांचे  मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे विषय साधन व्यक्ती बी यु निंबाळकर , अधिव्याख्याता Diet डॉ सुलक्षणा पवार  यांचेही मार्गदर्शन मिळाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles