तिन दिवस संगीत रसिकांना मेजवाणी
अंबाजोगाई ,
Ambajogai gunijaan sangeet samaroh पंडित.सी.आर व्यास यांच्या जन्मशताब्दी निमित्त अंबाजोगाई येथे आयोजित गुनीजान संगीत समारोहाचे उद्घाटन जेष्ठ समाजसेवक नंदकिशोरजी मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मानवलोक कार्यवाह अनिकेत लोहिया, डॉ.उत्तरेश्वर पाचेगांवकर,भगवानराव बाप्पा शिंदे,शशी व्यास,ज्योती व्यास उपस्थित होते .
प्रारंभी पं.सी.आर व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलन करण्यात आले.उद्घाटन समारंभाचे सुत्रसंचालन प्रकाश बोरगांवकर यांनी केले.वसुंधरा सेवाप्रतिष्ठान व ‘मानवलोक ‘च्या सहयोगात साकारलेल्या या महोत्सवासाठी मराठवाड्याच्या विविध शहरातून रसिकमंडळी आवर्जून उपस्थित होती.
सतारवादनाने प्रारंभ
आद्यकवी मुकूंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित तिन दिवशीय समारोहातील प्रथम पुष्प गुंफले ते सहाना बॅनर्जी या सतार वादिकेने.’पुरिया धनश्री’ सारखा अविट ऐराग सादर करीत त्यांनी समारंभाच्या यशस्वीतेची मुहुर्तमेढ रोवली.आलाप जोड,झाला मधून त्यांनी रागाची अतिशय अलवारपणे बढत केली.वादनातील चापल्य,मींडकाम,तालांगाशी खेळत खेळत त्यांनी अंतरा केव्हा गाठला हे कळले देखील नाही. तिनतालात तबला वादक प्रसाद पाद्धे समवेतची जुगलबंदी रसिकांना सुखावून गेली.शेवटी सहाना बॅनर्जी यांनीपिलू रागातील दादरा प्रस्तुत करून त्यांनी आपले वादन संपविले.