कडा
amolak jain celebrates 100 years घोडे , उंट, तुतारी वाजवत निघालेली छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक, अकोले तालुक्यातील आदिवासी महिलांनी सादर केलेले नृत्य,सकाळीच उठविणारे वासुदेव आणि चिमुकल्यांनी सादर केलेला प्रभू रामांचा देखावा कडेकारांचे लक्ष वेधून घेत होता. निमित्त होते येथील अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ, कडा या संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित भव्य शोभा यात्रेचे.
25 डिसेंबर 1924 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेला 99 वर्ष पूर्ण झाले असून,या संस्थेने १०० व्या वर्षात प्रवेश केले आहे. या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आणि संस्थेच्या स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . लोक कलावंत आणि त्यांच्या ताफ्याने या कार्यक्रमाची शोभा वाढविली. आदिवासी भागातील नृत्य नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी महिलांनी सादर करून नागरिकांची मने जिंकली.
सध्या राम मंदिर उद्घाटन जवळ आले आहे त्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांनी रामराज्याचा देखावा चित्ररथ केला. या रथात राम, लक्ष्मण, सिता, हनुमान, यांच्या व्यक्तीरेखा बसल्या होत्या.बालविवाह निर्मुलन या सारख्या सामाजिक विषयावर देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुलींनी हातात “बालविवाह एक अपराध”असे फलक झळकावले.
झांज पथकाच्या माध्यमातून चिमुकल्यांनी ठेका धरला होता
जिजाऊ माँ साहेब, बाल शिवाजी यांसारखे सजीव देखावे, वासुदेव, पिंगळा, गोंधळ, नंदीवाला, आदिवासी फुगडी नृत्य, महिला व पुरुषांचे बंजारा लेंगी नृत्य, किंगरीवाला, तुतारी, सुर, सनई, चौघडा, हलगी, संबळ, दिमडी, टाळ, तुणतुणे ही पारंपरिक लोकवाद्ये त्याच बरोबर पंजाबी ढोल, चाळीसगावचा सुप्रसिद्ध बँड ही या शोभायात्रेची ठळक वैशिष्ट्ये ठरली.
photo credit : sagar dhole, kalashri photo kada
मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या क्रीडांगणावर मान्यवरांच्या उपस्थितीत नवकार महामंत्र, श्री अमोलक ऋषिजी महाराज प्रतिमा पूजन, अमोलक गीत सादरीकरण करून या कार्यक्रमास प्रारंभ झाला.यावेळी प्रधानमंत्री हेमंत पोखरणा यांनी प्रास्ताविक केले. डॉ. महेंद्र पटवा यांनी आभार मानले.
मान्यवरांच्या हस्ते हिरवे झेंडे दाखवून व हवेत पाच रंगांची फुगे सोडवून या शोभा यात्रेचे शानदार उद्घाटन झाले. त्यानंतर ही शोभायात्रा मार्गस्थ झाली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष योगेश भंडारी, कार्याध्यक्ष कांतीलाल चाणोदिया, विश्वस्त अध्यक्ष गोकुळदास मेहेर, उपाध्यक्ष अनिल झाडमुथा, बिपिन भंडारी, प्रधानमंत्री हेमंत पोखरणा, मानद मंत्री विनोद बलदोटा, मानद मंत्री डॉ. महेंद्र पटवा, कोषाध्यक्ष डॉ. उमेश गांधी, विश्वस्त बाबुलाल भंडारी, कार्यकारी सदस्य प्रफुल्ल पोखरणा, संजय मेहेर, संतोष भंडारी, संतोष गांधी, संजय भंडारी, योगेश चाणोदीया अजय चोरबेले, प्रमोद भळगट, ललित कटारिया, संतोष शिंगवी, विश्वस्त सदस्य दिलीप पटवा, ह . भ. प. बबन महाराज बहिरवाल, ह.भ.प. दादा महाराज चांगुणे, श्रावक संघाचे अध्यक्ष रतिक लालजी कटारिया, माजी सभापती संजय ढोबळे, सरपंच युवराज पाटील, बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी, अनिल ढोबळे, पुंडलिक कर्डिले, उपसरपंच बाळासाहेब कर्डिले, शांतीलाल शिंगवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
संस्थेच्या मोतीलाल कोठारी विद्यालय, पी एम मुनोत जुनिअर कॉलेज, शिशुविहार, अमोलक इंग्लिश स्कूल, डी फार्मसी, फार्मसी कॉलेज, गांधी महाविद्यालय,चंदनमल भळगट प्राथमिक शाळा यांचे विद्यार्थी विद्यार्थिनी, झेंडा गाडी, लेझिम पथक, झांज पथक, ग्रंथ दिंडी, पंढरीची वारी, गणेशोत्सव, मौलाली बाबा पथक, मराठी बाणा, कर्तबगार महिला, महाराष्ट्रीयन महिला, मंगळागौर, सावित्रीच्या लेकी, विविधतेतून एकता, सर्व धर्म समभाव, विविध पारंपरिक व्यावसायिक, चांद्रयान अशा देखाव्यात सहभागी झाले होते.
मोतीलाल कोठारी विद्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुने बस स्थानक, ग्राम पंचायत कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राम मंदिर, बाजारपेठ, जैन गल्ली, धामणगाव रोड, केरुळ चौक मार्गे ही विद्यालयात पोहचली.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवनाथ पडोळे, गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार राठी, मोतीलाल कोठारी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम इ शिकारे, डी फार्मसीचे प्रा. महेश म्हस्के, डॉ. गफ्फार सय्यद,उपप्राचार्य डॉ. जवाहर भंडारी, यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.