बीड
beed news anandacha shidha सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुंटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयातील दारिद्रय रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना गौरी- गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी 1 किलो,या परिमाणात रवा, चना दाळ, साखर व 1 लिटर या परिमाणात खाद्यतेल हे शिधा जिन्नस समाविष्ट असलेला “आनंदाचा शिधा” कालावधित दिनांक 1 सप्टेंबर 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या 1 महिन्याच्या कालावधीत ई पॉस प्रणालिव्दारे रु. 100/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याचे नमूद केले आहे.
बीड जिल्हयातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुंटुंब योजना एपीएल केशरी शेतकरी योजना असे एकूण 490686 इतक्या पात्र शिधा पत्रिका धारकांना किटचे वाटप करण्यात येणार आहे. बीड जिल्हयात तालुकानिहाय लाभार्थी संख्या पुढीलप्रमाणे आहे.
आष्टी- 55 हजार 620,
पाटोदा- 23 हजार 678,
शिरुर (कासार)- 23 हजार 816,
बीड- 84 हजार 582,
गेवराई- 61 हजार 27,
माजलगाव- 55 हजार 110,
वडवणी- 15 हजार 916,
धारुर- 26 हजार 241,
केज- 45 हजार 241,
अंबाजोगाई- 49 हजार 559
परळी वैजनाथ- 49 हजार 304
एवढया पात्र शिधापत्रिका धारक लाभार्थ्यानां किटचे वाटप करण्यात येणार असून बीड जिल्हयातील सर्व शिधापत्रिका धारकांनी गौरी- गणपती उत्सवानिमित्त 100/- रु किमतीच्या या “आनंदाचा शिधा” किटचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंढे यांनी केले आहे.