‘साहेब’ पवार यांचा ‘दादा’ पवार यांना का हवाय आशीर्वाद?
बीड
Beed ncp sharad pawar sabha poster, बीड मध्ये उद्या 17 रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फुट पडल्यानंतर शरद पवार यांची ही दुसरी सभा आहे. या सभेसाठी येणाऱ्या पवारांना मात्र बीड मध्ये जागोजागी हे बॅनर नजरेस पडणार आहे,त्याचा मजकूर आहे,”साहेब कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या”, त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी थेट शरद पवारांना साद घातली आहे.
राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्या नंतर शरद पवार हे दुसरी सभा बीड शहरात होत आहे. यासाठी शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर इथे पाहावयास मिळायला हवे होते, मात्र इथे वेगळेच बॅनर सध्या दिसत आहेत. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते थेट नगर रोड पर्यंत हे बॅनर झळकले आहेत.
‘साहेब’ पवार बीड मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना हे बॅनर दिसावेत यासाठी हे दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. हे बॅनर कोणी लावलेत हे यावरून् स्पष्ट होत आहे. ‘दादा’ समर्थकांनी हे बॅनर लावलेत हे अगदी स्पष्ट होत आहे. मात्र आता सामान्य मतदार संभ्रमात पडला आहे.की हे नेमके प्रकरण काय आहे.
याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न.
राज्यात राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित पवार गट वेगळा झाला.त्यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. नेमका हाच धागा पकडून ‘साहेब’ पवार यांनी सुरुवात केली. आधी येवला आणि आता बीड. बीड च्या पिच वर 86 वर्षाचे पवार बॅटिंग करणार आहेत. मात्र या बॅटिंगच्या अगोदर पवारांच्या मानसिकतेत बदल करण्याचा हा प्रकार दिसतोय. याला पवार किती साद देतात , आणि याबाबत आपल्या मनात सॉफ्ट कॉर्नर ठेवतात का? ते उद्याच्या त्यांच्या भाषणात समजून येईल.
बीड जिल्ह्यातील मतदार भावनिक आहेत. ते वास्तविकतेपेक्षा भावनिक ते ला जास्त लवकर प्रतिसाद देतात. त्यामुळे ‘साहेब’ पवार नेमकी कशी भावनिक साद घालतात ते पाहणे उत्सुकतेचं आहे.
‘साहेब’ पवार यांना मानणारा जुना,राष्ट्रवादीचा गट मोठा आहे. ग्रामीण भागात पवारांच्या विचारांना आधार देणारा मोठा गट तयार झाला आहे.जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार बीड मतदार संघातील आमदार संदीप क्षीरसागर वगळता माजलगाव, आष्टी, परळी,या मतदार संघातील आमदार ‘दादा’ पवार यांच्या बाजूने आहेत. या सर्वांचे नेतृत्व कृषी मंत्री धनंजय मुंडे करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पक्षाला मानणारे असतानाही केवळ आमदार फुटले म्हणून मतदार कायम राहावेत यासाठी साहेब पवारांनी बीडची निवड केली असावी. किंबहुना ‘दादा’ पवार यांना साथ देणाऱ्या पहिल्या फळीतील नेते मुंडे मुंडे यांनाही चपराक देण्याचा ‘साहेब’ पवारांचा हा प्रयत्न असावा.
नुकतीच ‘साहेब’ पवार आणि ‘दादा’ पवार यांची पुण्यात गुप्त भेट झाली.या भेटीचे पडसाद अजून उमठत असताना बीड मधील हे बॅनर त्याच्या पुढचे पाऊल असेच म्हणावे लागेल.त्याच त्याच बाबी पुनः पुनः समोर आणून समोरच्या व्यक्तीच्या मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण करण्याचा हा प्रयत्न म्हणावे लागेल.