शिरापूर येथील कोंबड्यांचा मृत्यूचा अहवाल आला
आष्टी दि 19 प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना 13 रोजी घडली होती. शिरापूर येथे पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने शिरापूर येथे जाऊन मृत कोंबड्यांची पाहणी केली होती त्यामध्ये हे मृत्यू बर्ड फ्लू झाले नसल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी मंगेश ढेरे यांनी दिली.
शिरापूर येथे बाधित कोंबड्यांचे नमुने गोळा करून पुणे येथे पाठविण्यात आले होते त्यानंतर हे अहवाल नकारात्मक आले असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी मंगेश ढेरे यांनी दिली.
शिरापूर येथील किरण तागड यांच्या कडील कोंबड्या मेल्यानंतर या परिसरातील 7 शेतकऱ्याच्या कोंबड्या मेल्याचे उघडकीस आले होते.
पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा आयुक्त रवी सुरेवाड आणि तालुका पशुसंवर्धन अधिकारी मंगेश ढेरे यांनी तात्काळ दखल घेऊन आज या भागातील मरतुक पक्षांचे नमुने गोळा केले.तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.त्यांच्या पाहणी दरम्यान 7 शेतकऱ्यांच्या कोंबड्या बाधित झाल्याचे आढळून आले होते.(बर्ड फ्लू)
हेही वाचा :नगर बीड रोड वर कड्याजवळ वऱ्हाडाची ट्रॅव्हल्स पलटली