Mavir jayanti भगवान महावीरांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

- Advertisement -
- Advertisement -

राजेेंद्र जैन/ कडा

Mavir jayanti अहिंसा परमो धर्म” ची जगाला शिकवण देणाऱ्या त्रिशला नंदन वीर भगवान महावीरांची जयंती कडयात मोठ्या उत्साहात अतिभव्य साजरी करण्यात आली. महावीरांच्या जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी सकाळी जैन मंदिरात ध्वजारोहण करून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भगवान महावीरांच्या प्रतिमेची फुलांनी सजवलेली पालखी व रथातून ग्रामदक्षिणा करीत सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत महावीरांचा जयघोष करीत जैन श्रावक, श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Mavir jayanti

 

आष्टी तालुक्यातील कडा येथे मंगळवारी सकाळी अहिंसेचे पुजारी भगवान महावीरांचा जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जन्म कल्याणात महोत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील जैन मंदिरात सकाळी जैन बांधवांकडून ध्वजारोहण व अभिषेक झाल्यानंतर महावीरांच्या प्रतिमेची आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखी व अश्व रथातून ग्रामदक्षिणा करीत शांततेत सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी “त्रिशाला नंदन वीर की जय बोलो महावीर की,” असा शोभायात्रेत गगनभेदी जयघोष करीत करण्यात आला. या शोभायात्रेत जैन बांधवांकडून ठिकठिकाणी प्रसाद म्हणून मिठाई व थंड पाण्याचे स्टॉल लावण्यात आले होते. तर जैन स्थानकात बालगोपाळांकडून भगवान महावीरांवर आधारित सांस्कृतिक नाटिका सादर करण्यात आली. या भव्य सवाद्य शोभायात्रेत कडा शहरातील जैन श्रावक श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles