उघड्या अंगाने भाविकांनी घेतले या नाथांचे दर्शन ! काय आहे परंपरा

- Advertisement -
- Advertisement -

machindranath उघड्या अंगाने भाविकांनी घेतले या नाथांचे दर्शन ! काय आहे परंपरा?

machindranath  यांच्या  समाधी उत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविकांनी बीड जिल्ह्यातील सावरगाव म्हणजेच श्रीक्षेत्र मायंबा येथे दर्शन घेतले.

नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी असलेले मच्छिंद्रनाथ किंवा मत्सेंद्रनाथ होय.नाथ संप्रदायातील कानिफनाथआणि मच्छिंद्रनाथ यांची समाधी अहमदनगर बीड या  दोन जिल्ह्याच्या सीमारेषेवर पाहायला मिळतात.नाथांचे वास्तव्य हे या गर्भगिरी पर्वतात असल्यामुळे नाथ संप्रदायातील आद्य गुरु कानिफनाथ आणि  मच्छिंद्रनाथ यांच्या पर्वत रांगेत पाहायला मिळत आहे.

गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी कनिफनाथ यांची   समाधी असलेल्या मढी kanifnath येथे फुलोरबाग ची यात्रा भरते. तर मायंबा येथे अमावस्येच्या निमित्ताने समाधी उत्सवाचे आयोजन केले जाते.या अमावस्येच्या निमित्ताने या समाधीस्थळावर लाखो भाविकांची गर्दी जमते.कालपासून सुरू असलेल्या या उत्सवामध्ये लाखो भाविकांनी मच्छी मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेतले.
वर्षातून एकदाच म्हणजे गुढी पाडव्याच्या रात्री मच्छिंद्रनाथाची समाधी भाविकांसाठी उघडी केली जाते.

 

machindranath
machindranath

त्यासाठी भाविकांना या समाधीचे दर्शन घेण्यासाठी फक्त  अंगावर कोणतेही वस्त्र ने ठेवता  फक्त अंतर्वस्त्रा वर आंघोळ करून दर्शन घेण्याची  मुभा दिली जाते.गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा आहे.अमावस्येच्या काळात स्त्रियांना या ठिकाणी प्रवेश नसतो.

या नाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक  machindranath gad वर दर्शन घेण्यासाठी येतात.

मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी देवस्थानच्या माध्यमातून भाविकांची सोय करण्यात आली होती. भाविकांनी कपडे काढल्यानंतर त्यांच्या अंघोळीसाठी तसेच ओले कपडे करण्यासाठी खास पाण्यांच्या फवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती.भाविक दर्शन रांगेमध्ये पुढे पुढे जात असतानाच या तुषार सिंचनाच्या माध्यमातून भाविकांना कपडे ओले करण्यासाठी ची सोय करण्यात आली होती.

ओले कपडे घालून या नाथांच्या या समाधीला स्पर्श करण्याची संधी या निमित्ताने भाविकांना मिळते.त्यासाठी भाविक रात्रीपासूनच उघड्या अंगाने दर्शन रांगेत उभे राहतात.

समाधी वर्षभरात गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सर्वसामान्य भाविकांसाठी खुली करण्यात येते. तर सूर्य उगवणीच्या आत पुन्हा समाधीचे दरवाजे बंद करण्यात येतात.

रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान <span;>संजीवन  समाधीवर सुगंधी उटण्याचा लेप लावण्यात येतो. या दिवशी राज्यसह देशभरातून भाविक श्री क्षेत्र मायंबा येथे येत असतात. तसेच या निमित्ताने रात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तर विद्युत रोषणाईने मच्छिंद्रनाथाचा मायंबा गड उजळून निघाला होता. तसेच मच्छिंद्रनाथ महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.

Machindranath samadhi  मंदिरावर या उत्सवाच्या निमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

गुढीपाडव्याच्या आदल्या दिवसापासून पहाटे पर्यंत  पाच लाखहून अधिक भाविकांनी समाधीवर सुंगधी उटणे लावुन नुतन वस्र अर्पण करून नाथांचे पुजन करत लाखो भावीकांनी नाथांचा आशिर्वाद घेतला. तर भाविकांना प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles