नगर,
afu plant शेतीतून हमखास उत्पन्न मिळावे यासाठी शेतकरी अनेक वेगवेगळे प्रयोग शेतीमध्ये करत असतात. यामध्ये शेतकरी सक्सेस होतात . मात्र त्यासाठी शासनाने परवानगी दिलेले पीक असेल तर. मात्र अनेक शेतकरी पैसे मिळविण्याचा नादात चुकीच्या मार्गाचा वापर करतात आणि जेलची हवा खातात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बीड जिल्ह्यातील शिरसाळा येथील शेतकऱ्यांनी अफूची शेती केली. या शेतकऱ्यांनी शेतात अफूची लागवड केली आणि जेलमध्ये जावे लागले.
असाच प्रयत्न अहमदनगर जिल्ह्यातील शहापुर व देवगांव शिवारामध्ये रावसाहेब गिलबिले,बाबुराव साळवे यांनी केला आणि पोलिसांना याची खबर मिळताच पोलिसांनी छापा टाकून हे शेती उध्वस्त करत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अफूचे झाड पाहिल्यानंतर त्यांची विचारपूस केली. त्यावेळी खसखस पीक असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
नेवासा तालूक्यातील शहापुर शिवारामध्ये बाबुराव साळवे व देवगांव शिवारामध्ये रावसाहेब गिलबिले यांनी त्याचे शेतामध्ये बेकायदेशिररित्या गांजा व afuअफू ची लागवड केली.
अशी बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रथम शहापुर, ता. नेवासा येथील बाबुराव लक्ष्मण साळवे यांचे शेतात पहाणी केली असता,गव्हाचे शेतामध्ये 2.5 फुट उंचीची दोन व घरा समोर 8 फुट उंचीचे एक गांजाचे झाड तसेच घरा समोर पोत्यावर गांजाचे झाडाचा पाला काढुन तो वाळवण्यासाठी ठेवल्याचे दिसुन आला.
त्यामुळे पोलिसांनी आरोपी बाबुराव लक्ष्मण साळवे याचे कब्जातील शेतामधुन 1,11,420/-रु. किंमतीची तीन गांजाची लहान मोठी हिरवी झाडे कारवाई करुन जप्त केली.
तसेच देवगांव, ता. नेवासा येथील रावसाहेब भागुजी गिलगिले यांचे शेताची पाहणी केली असता त्यांच्या शेतात अफूच्या झाडांची लागवड केल्याचे दिसुन आले.
आरोपी रावसाहेब भागुजी गिलबिले वय 38, रा. देवगांव, ता. नेवासा याचे कब्जातील शेतामधुन 13,84,000/- रु. किंमतीची 69.500 किलो ग्रॅम वजनाची लहान मोठी 621 अफुची झाडे व बोंडे कारवाई करुन जप्त करण्यात आली. ही कारवाई केल्यानंतर या शेतकऱ्याला अफू म्हणजे काय?,अफूची शेती म्हणजे काय? हे नक्कीच कळले असेल.
पोलिसांनी कारवाई करुन 1,11,420/-रु. किंमतीची तीन गांजाची लहान मोठी हिरवी झाडे व देवगांव येथे कारवाई करुन 13,84,000/- रु. किंमतीची 69.500 किलो ग्रॅम वजनाची लहान मोठी 621 अफुची झाडे व बोंडे असा एकुण 14,95,420/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून कायदा कलम 8 (क), 15, 18, 20 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.