.
अहमदनगर,
Ramdas Athavale यांनी आगामी निवडणुका मित्र पक्षांच्या मदतीने जिंकण्यासाठी एक रणनीती ठरविण्यात येणार असून येत्या २८ मे रोजी शिर्डीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन बोलावण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि पक्ष प्रमुख रामदास आठवले यांनी आज शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी मंत्री अविनाश महातेकर व अन्य राज्य पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी रिपाई पक्ष राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली.
त्यांनी पुढे सांगितले की, आगामी निवडणुकीत रिपाइला विधानसभेत १५ आणि लोकसभा निवडणुकीत २- ३ जागा सोडाव्यात.तसेच विविध महामंडळातील सत्तेतही विविध पदांवर संधी मिळावी. तसेच जिल्हा परिषदेत प्रत्येक जिल्ह्यात ४-५ आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ८-१० जागा सोडाव्यात याशिवाय महापालिका, नगर पालिका निवडणुकीतही रिपाई ला सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे. विधान परिषदेत १२ पैकी १ जागा मिळण्याची मागणीही आठवले यांनी यावेळी केली.
मढी येथे दर्शनासाठी चाललेल्या चार युवकांचा बुडून मृत्यू.
२८ मे रोजी होणाऱ्या पक्ष मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व भाजप नेत्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे . यावेळी नागालंड येथील दोन विजयी आमदारही उपस्थित राहणार आहेत. असेही आठवले यांनी आज सांगितले.
नरेंद्र मोदी हे “सबका साथ, सबका विकास ” हे ब्रीद घेऊन गेल्या नऊ वर्षांपासून देशाचा भरीव विकास करणारे भक्कम पंतप्रधान ठरले असुन सध्यातरी त्यांच्या जागी अन्य कोणी पंतप्रधान होणे शक्य नाही. ज्यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद नीट सांभाळता आले नाही ते देशाचे पंतप्रधान पद काय सांभाळणार? अशी कोपरखीळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावली.
ते पुढे म्हणाले की, मोदी यांच्या विरोधात लढणाऱ्या प्रत्येक पक्षाचा नेता हा पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे. उध्दव ठाकरे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे संजय राऊत यांचे व्यक्तिगत मत आहे असेही ते म्हणाले.
मनसे नेते राज ठाकरे यांच्याशी संभाव्य युतीबाबत आठवले म्हणाले की, सध्या भाजप, सेना आणि रिपाई असे तिघे एकत्र असल्याने मनसेशी युती करण्याची गरज नाही. मुंबईची सत्ता मिळविण्या एव्हढी ताकद त्यांच्याकडे नाही. मात्र तसा त्यांचा काही प्रस्ताव आल्यास दिल्लीतून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असे वाटत नाही.मात्र त्यांच्या प्रमाणेच मराठी मानसांसाठी लढायला आम्हीही सोबत आहोतच अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणुक शिर्डी मतदार संघातून लढविण्याची इच्छा व्यक्त करीत आठवले म्हणाले की, माझी राज्यसभेची मुदत २०२६ पर्यंत आहे. मात्र आपण केंद्रात मंत्री असल्याने त्या माध्यमातून शिर्डी लोकसभा मतदार संघातील गावागावांचा आणि शहराशहरांचा विकास होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रभावी नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकत्र येऊन मला या मतदार संघातून आगामी निवडणुक लढविण्याची संधी द्यावी . विद्यमान शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांना अन्य ठिकाणी संधी देता येईल. असे सांगत जनताही आपल्या बरोबर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.