समाज कल्याण विभाग कला व क्रीडा महोत्सवात विभागीय स्तरावर अहमदनगर जिल्हा अव्वल स्थानी

- Advertisement -
- Advertisement -

समाज कल्याण विभाग कला व क्रीडा महोत्सवात विभागीय स्तरावर अहमदनगर जिल्हा अव्वल स्थानी

अहमदनगर,

social welfare nashik division sports  समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच क्रीडानैपुण्य विकसित होण्यासाठी राज्यात समाज कल्याण विभागाच्या वतीने कला व क्रीडा अविष्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नाशिक विभागीय स्तरावरील स्पर्धा थाटात संपन्न झाल्या आहेत. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शासकिय निवासी शाळामधील विद्यार्थी विविध खेळात अव्वलस्थानी राहिले आहेत. विभागीय स्तरावरील झालेल्या या स्पर्धेतील सर्व खेळाडू विद्यार्थी हे राज्यस्तरीय स्पर्धासाठी पात्र ठरले आहेत.

दि ८ फेबुवारी २०२३ रोजी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या क्रीडा भवनात संपन्न झालेल्या विभागीय स्तरावरील स्पर्धाचे उद्घाटन विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ यु.डी. चव्हाण यांच्या हस्ते व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण बाळासाहेब सोळंकी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या स्पर्धेत नाशिक विभागातील पाच जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळेतील ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 100 मीटर धावणे या स्पर्धेत मुलींच्या १४ वर्षाखालील लहान गटात कुमारी तनिष्का अमोल राजगुरू(अहमदनगर.) या विद्यार्थीनीने प्रथम तर मुलांच्या ग़टात पुष्कराज रंगनाथ जाधव, (जळगाव) यांने प्रथम क्रमांक मिळविला. १०० मीटर धावणे या स्पर्धेत मुलींच्या १७ वर्षाखालील मोठ्या ग़टात दीक्षा अशोक पवार, (अहमदनगर )या विद्यार्थीनीने प्रथम तर मुलांच्या

ग़टात अजय नंदू मोरे, (जळगाव) याने प्रथम क्रमांक मिळविला. २०० मीटर धावणे या स्पर्धेत मुलींच्या १४ वर्षाखालील लहान ग़टात मेघा अशोक गायकवाड (अहमदनगर) या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक तर मुलामध्ये विवेक अनिल बैसाने, (नंदुरबार) याने प्रथम क्रमांक मिळवला. २०० मीटर धावणे या स्पर्धेत मुलींच्या १७ वर्षाखालील मोठ्या ग़टात दीक्षा अशोक पवार (अहमदनगर) या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक तर मुलामध्ये समीर दादा पवार, (अहमदनगर) याने प्रथम क्रमांक मिळवला.

४०० मीटर धावणे या स्पर्धेत लहान ग़टात कावेरी राजू पालवी (धुळे) या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक तर मुलामध्ये गुरवेश तानाजी ढुमणे, (रायगड) याने प्रथम क्रमांक मिळवला.

मोठ्या ग़टात प्रतिभा विठ्ठल बोरसे (धुळे) या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक तर मुलांमध्ये वतन रायसिंग पटले (धुळे) याने प्रथम क्रमांक मिळवला. ४०० मीटर रिले या स्पर्धेत लहान ग़टात श्रद्धा वालसिंग परमार व संघ, नंदुरबार (मुली), गौरव माणिक

\गायकवाड व संघ नाशिक (मुलांचा) संघाने विजय प्राप्त केला.तर मोठ्या ग़टात हरिता बाळासाहेब थोरात व संघ अहमदनगर (मुली) व वतन रायसिंग पटले व संघ धुळे (मुलांचा ) संघाने विजय प्राप्त केला. थाळी फेक या स्पर्धेत लहान

ग़टात वैष्णवी महेश उदमले (अहमदनगर)या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक तर मुलामध्ये राज रवींद्र गायकवाड (रायगड) याने प्रथम क्रमांक मिळवला . तर मोठ्या ग़टात आम्रपाली महेंद्र इशी (नंदुरबार) या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक तर मुलामध्ये दिनकर देबा पटले (नंदुरबार) याने प्रथम क्रमांक मिळवला.

लांब उडी स्पर्धेमध्ये लहान ग़टात तेजस्विनी नंदू बैसाणे (नंदुरबार) या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक तर मुलामध्ये राज रवींद्र गायकवाड (रायगड) याने प्रथम क्रमांक मिळवला . तर मोठ्या ग़टात दीक्षा अशोक पवार (अहमदनगर) या विद्यार्थीनीने

प्रथम क्रमांक तर मुलामध्ये आयन मनोज नाक्ते (रायगड) याने प्रथम क्रमांक मिळवला . खो-खो स्पर्धेत लहान ग़टात अहमदनगर तर मोठ्या गटात (धुळे) जिल्हाचा संघ विजय ठरला. रस्सीखेच स्पर्धेत लहान ग़टात मुलीच्या धुळे, मुलांच्या

गटात जळगाव संघ विजय ठरला. तर मुलीच्या मोठ्या गटात अहमदनगर ,मुलामध्ये – जळगाव संघ विजय ठरला.

भूमिका-अभिनय या स्पर्धेत प्रथम क्रमांक -शासकीय निवासी शाळा मुली प्रथम अहमदनगर ,द्वितीय क्रमांक- शासकीय निवासी शाळा नंदुरबार तर मुलांमध्ये प्रथम शासकीय निवासी शाळा नंदुरबार, तर द्वितीय क्रमांक शासकीय निवासी शाळा

जळगाव यांचा संघ विजय ठरला. लोकनृत्य स्पर्धांचे स्पर्धेत मुली प्रथम क्रमांक- शासकीय निवास शाळा नंदुरबार द्वितीय क्रमांक शासकीय निवासी शाळा धुळे. तर मुलांच्या संघामध्ये प्रथम क्रमांक -शासकीय निवासी शाळा अहमदनगर . तर द्वितीय क्रमांक शासकीय निवासी शाळा रायगड याप्रमाणे संघ विजय ठरले आहेत.

विजयी सर्व खेळाडूंचे मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी गौरव करण्यात आला.

स्पर्धा यशस्वीतेसाठी विभागातील सर्व जिल्ह्यांचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण , विभागातील सर्व शासकीय निवासी शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक, तसेच विविध आश्रम शाळांचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले, तर या स्पर्धांना परिषद म्हणून

राहुरी कृषी विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे सर्व क्रीडा शिक्षकांनी कामकाज पाहिले.समाज कल्याण विभागात प्रथमच संपन्न झालेल्या या क्रीडा व कला स्पर्धांच्या आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून विभागाचे धन्यवाद करण्यात येऊन आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles