अहमदनगर
dattajayanti जिल्ह्यातील विविध दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती करण्यात आली. जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील देवगड येथे जयंतीचा साजरा करण्यात आला दत्त जन्म सोहळा या ठिकाणी पार पडला. या दत्त जयंती सोहळ्यासाठी औरंगाबाद सह नगर बीड जिल्ह्यातील लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरामध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
अहमदनगर शहरातील सावेडी भागातील दत्त मंदिर आणि किसनगिरी नगर दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव सोहळा सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.
यानिमित्ताने जिल्ह्यातील विविध दत्त मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती तसेच ही मंदिर फुलून गेली.
दत्तजयंतीच्या निमित्तीने अहमदनगर शहरातील पाईपलाईन रस्त्यावरील गुरुदत्त भक्तिधाम विद्युत रोषणाईने उजळले आहे.
मंदिरावर आणि औदुंबराच्या वृक्षासह परिसरांत रोषणाइ करण्यात आली आहे. भगवान दत्त जयंती च्या निमित्ताने देवगड येथील दत्त मंदिराची प्रतिकृती असलेल्या संत किसनगिरी नगर मध्ये हा उत्सव पार पडला .
सकाळी अभिषेक आणि नित्यपूजेने उत्सवाची सुरुवात झाली. असून दिवसभर भाविकांसाठी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी दुपारी दत्त मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले.
सायंकाळी संगीत भजन आणि त्यांनतर दत्त जन्मोत्सव संपन्न झाला असल्याचे येथील विश्वस्त् संजय नेहूल यांनी सांगितले.