तिसगाव ग्रामपंचायत निवडणुकीत लागणार दिग्गजांचा कस

- Advertisement -
- Advertisement -

Tisgaon grampanchyat election तिसगाव ग्रामपंचायत निवडणुकीत लागणार दिग्गजांचा कस

 

तिसगाव

Tisgaon grampanchyat election तिसगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दिग्गजांचा कस लागणार असून सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर ग्रामपंचायतीमध्ये कोणाचा पॅनल येणार हा तिसगावकरांसाठी उत्सुकतेचा विषय बनला आहे.

पाथर्डी tisgaon pathardi तालुक्यामध्ये मोठी ग्रामपंचायत म्हणून तिसगावचा नावलौकिक आहे. या गावांमध्ये मोठी बाजारपेठ आणि ग्रामपंचायत मोठी उत्पन्नाचे मार्ग अधिक त्यामुळे या ग्रामपंचायतीवर माजी सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांनी कायम आपले वर्चस्व ठेवले आहे.

मात्र आता त्यांच्याच समवेत असलेले असलेले अनेक गावातील कार्यकर्ते नेते त्यांच्यापासून दूर गेल्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक डोकेदुखी होणार आहे.

गेल्या अनेक वर्षापासून तिसगाव ग्रामपंचायतीवर काशिनाथ पाटील लवांडे यांचे वर्चस्व जरी असले तरी त्यांनी इतरांना सामावून घेतल्यामुळे त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. मात्र यावेळी ही संधी हुकणार का असा प्रश्न पडला आहे.

तिसगावचे  सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. यासाठी  सहा महिला उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. एकूण 17 जागा असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये सहा वॉर्ड आहेत या 17 जागांसाठी 77 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.  उद्या या अर्जांची छाननी होणारा असून यामध्ये किती अर्ज टिकतात हे मात्र हे उद्या कळेल.

उमेदवारी अर्ज भरण्यापेक्षा माघारी काढून उमेदवारांची समजूत काढणं हे मोठे जिकरीचे  आहे. त्यामध्ये स्थानिक नेते कितपत यशस्वी होतात  यावर आगामी निवडणूक अवलंबून असणार आहे.

माजी सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांच्या विरोधात बाळासाहेब लवांडे, इलियास शेख, इल्फाम शेख यांच्यांसह अनेकांनी  एकत्रित येऊन मोट बांधली आहे. भाजपचे नंदकुमार लोखंडे  यांनी सध्या तटस्थ भूमिका घेतली आहे.

तर काशिनाथ लवांडे यांचे विरोधक असलेले भाऊसाहेब लोखंडे  यांनी सरपंच पदासाठी आपल्या पत्नीचा अर्ज हा काशिनाथ लवांडे यांच्या गटातून भरला आहे. त्यामुळे ते काशिनाथ लवांडे यांना मिळाले आहे. विरोधक एकत्र येऊन कशा पद्धतीने आपली मोट बांधतात हे येत्या काळात दिसून येईल.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles