Mseb news today शेतकऱ्यांचा महावितरणच्या अधिकाऱ्याला घेराव
आष्टी
Mseb news today टाकळीअमिया,सराटेवडगांव, निमगांव चोभा ,रूई नालकोल, नांदा, गेल्या पाच दिवसांपासून अचानक विद्युत पुरवठा बंद केल्याने संतप्त शेतकर्यांनी सोमवारी सकाळी टाकळी अमिया येथील महावितरण ३३ के.व्ही.सबस्टेशन येथे अधिकाऱ्यांना घेराव घालत निषेध व्यक्त केला.
आष्टी ashti news today तालुक्यातील टाकळी अमिया येथील ३३ के.व्ही. सबस्टेशन मधुन परिसरातील गावांना विद्युत पुरवठा केला जातो.पण सध्या चार,पाच दिवसांपासून महावितरणने अचानक विद्युत पुरवठा बंद केला. गहु,ज्वारी,हरभरा, कांदा या पिकांना पाण्याची गरज असल्याने शेतकरी जेरीस आला आहे. त्यातच महावितरणे विद्युत पुरवठा बंद केल्याने परिसरातील संप्तत शेतकर्यांनी चक्क टाकळी अमिया येथील सबस्टेशन सोमवारी सकाळी अधिकाऱ्यांना घेराव घालत महावितरणच्या अभियंत्याना धारेवर धरून निषेध व्यक्त केला.
यावेळी ज्ञानेश्वर चौधरी, प्रा.राम बोडखे, डाॅ.शिवाजी शेंडगे, अमोल शितोळे, पिनु चौधरी , टाकळी अमिया, रूईनालकोल, सराटेवडगांव, चोभानिमगांव, नांदा या गावातील शेतकरी उपस्थित होते.
याबाबत कडा येथील महावितरणचे सहायक अभियंता दत्तात्रय दसपुते यांना विचारणा केली असता ते म्हणाले की थकित वीजबिलापोटी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून सबस्टेशनचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला असल्याचे त्यानी सांगितले.
पेरुची लागवड व्यापारी तत्वावर करणे गरजेचे