लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारसह दोघे अटकेत

- Advertisement -
- Advertisement -

 

सोलापूर

solapur news प्राथमिक शाळेच्या मान्यतेसाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून 25 हजार रुपये कार्यालयाच स्विकारणार्‍या सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी solapur education officer  किरण लोहार यांच्यासह दोघांना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

ही कारवाई सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आल्याने याबाबत एकच खळबळ उडाली आहे.

सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार हे ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त डीसले गुरुजी ranjit disale  यांच्यावरील कारवाईमुळे आले होते चर्चेत आले होते.
याप्रकरणातील तक्रारदाराची उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे स्वयंअर्थसहाय प्राथमिक शाळा आहे. पाचवी ते आठवीचे वर्ग वाढण्यासाठी शाळेने वर्गवाढीच्या परवानगीची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहारा यांच्याकडे केली होती.

त्याचा आयडी देण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली. दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे solapur acb  तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची शहानिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागतच सापळा लावला होता.

सायंकाळी सहाच्या सुमारास शिक्षणाधिकारी लोहार यांनी तक्रारदाराकडून लाचेची 25 हजार रुपयांची रक्‍कम स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोहार यांना रंगेहात अटक केली.

यावेळी लोहार यांच्यासमवेत त्यांच्याच कार्यालयातील कनिष्ठ सहायक अल्ताफ पटेल या लिपीकालाही अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई निरीक्षक उमेश महाडीक यांच्या पथकाने केली असून सदर बझार पोलिस ठाण्यात याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles