दिवाळीच्या सुट्ट्या शाळांना पूर्वीप्रमाणेच
औरंगाबाद
दिवाळीच्या सुट्ट्या कमी करण्यात आल्यावर शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांनी एका आदेशाद्वारे जाहीर केले होते.मात्र हा आदेश मागे घेत सुट्ट्या पूर्वीप्रमाणेच राहतील असा आदेश शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी काढला आहे.
सतरा ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर झाल्या असताना आणि त्याप्रमाणे सर्व नियोजन झालेले असताना दिनांक बावीस नोव्हेंबर पासून दिवाळी सुट्ट्या जाहीर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांनी काढले होते .
शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणी करण्यासाठी आणि या निमित्ताने विभागातील सर्व शाळांमध्ये संपर्क करण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीत बदल करायला शिक्षण विभागाला दिनांक 12 रोजी पत्र दिले. आणि दिवाळीच्या सुट्टीत बदल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
त्यानंतर औरंगाबाद येथील विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी सुट्ट्यामध्ये बदल करण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकारी यांना आदेश दिले होते.
यासंदर्भात शिक्षकांनी शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या विरुद्ध शिक्षकांनी संताप व्यक्त केल्यानंतर काळे यांनी पुन्हा शिक्षण उपसंचालक यांना पत्र देऊन सुट्ट्या कायम ठेवण्याचे सांगितले.
शिक्षकांचा रोष पाहता विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी आपला निर्णय मागे घेत सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी यांना सर्व शाळांच्या सुट्ट्या पूर्ववत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार दिनांक 17 आॅक्टोबर पासून दिनांक 7 नोव्हेंबर रोजी पर्यन्त दिवाळीच्या सुट्टी जाहीर केलेल्या आहेत. दिनांक 8 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती ची सुट्टी जोडून आल्याने दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा 9 नोव्हेंबर रोजी भरणार आहेत.