Ashti railway station कसे असणार नवीन नगर- न्यू आष्टी रेल्वे चे वेळापत्रक

- Advertisement -
- Advertisement -

 

 

New Ashti station

Ashti railway station  न्यू आष्टी रेल्वे स्थानकातून अहमदनगर साठी पहिली रेल्वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सोडली जाईल. यावेळी  माननीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दादाराव पाटील दानवे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवीन आष्टी – अहमदनगर नवीन मार्गाचे उद्घाटन करतील आणि  new ashti railway station नवीन आष्टी – अहमदनगर डेमू (DEMU) सेवेच्या उद्घाटनाच्या सेवेला दि. 23.9.2022 रोजी प्रारंभ होईल.

बहुप्रतीक्षित आष्टी नगर रेल्वेचे 23 सप्टेबरला उद्घाटन

Beed railway यावेळी महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ,  माजी मंत्री पंकजा मुंडे, अहमदनगरच्या महापौर रोहिणी शेंडगे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, डॉ. सुजय विखे पाटील, श्रीमती रजनी पाटील, यांच्यासह विधानसभा सदस्य, धनंजय मुंडे, बाळासाहेब आजबे, संग्राम जगताप, नमिता मुंदडा, संदिप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, लक्ष्मण पवार, विधान परिषद सदस्य सुरेश धस, विक्रम काळे, सतीश चव्हाण, नगराध्यक्षा आष्टी पल्लवी धोंडे, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,

Ashti railway station पार्श्वभूमी आणि फायदे:

Ashti to Ahmednagar distance 66 किमी नवीन आष्टी-अहमदनगर ब्रॉडगेज लाईन 261 किमी अहमदनगर – बीड- परळी वैजनाथ beed parli railway नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे ज्यामध्ये भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्यात 50-50 खर्चाचा वाटा आहे.

Lumpy skin disease लम्पी प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे पशुधन माझी जबाबदारी

डेमू (DEMU) सेवा नवीन आष्टी – अहमदनगर पट्ट्यातील रहिवाशांना आणि जवळपासच्या भागातील रहिवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल.

यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक – आर्थिक विकासाला चालना मिळेल.

Ahmednagar to ashti train timetable डेमू ट्रेन अहमदनगरहून सकाळी 07.45 वाजता सुटेल आणि न्यू आष्टीला सकाळी 10.30 वाजता पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात न्यू आष्टी येथून सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि दुपारी 1.55 वाजता अहमदनगर येथे पोहोचेल.  ही गाडी रविवार वगळता दररोज धावणार आहे.

कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोहो येथे थांबेल.

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles