ताम्हिणी घाटात कार २०० फुट कथड्यावरुन खाली कोसळली ३प्रवासी ठार ,३जखमी.

- Advertisement -
- Advertisement -

रायगड

 

रायगड जिल्ह्यातील माणगावपासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माणगाव – पुणे रस्त्यावरील ताम्हिणी घाटात स्विफ्ट डिझायर कारला भिषण अपघात होऊन कार २०० फुट कठड्यावरुन खाली दरीत कोसळली.

या अपघातात कारमधील ३ प्रवासी जागीच ठार झाले असुन ३ प्रवासी गंभीर जखमी होऊन कारचा चुराडा झाला आहे.

सदरचा अपघात शनिवार दि. २० आँगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडला.

सदर अपघाताबाबत अधिक वृत्त असे की वाशीम जिल्हा अकोला येथुन आलेल्या स्विफ्ट कारमध्ये एकुण ६ प्रवासी होते. ते कोकणात पर्यटनासाठी आले होते. ते पुन्हा आपल्या गावी वाशीमला परत जात असताना त्यांची गाडी ताम्हिणी घाटात आली असताना वळणावर त्यांची कार २०० फुट कठड्यावरुन खाली दरीत कोसळली. या अपघाताची माहिती समजताच माणगाव पोलिसांसह साळुंखे रेस्क्यू टिम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला. कारमध्ये मयत झालेले ३ प्रवासी व जखमी ३ प्रवासी अडकून पडले होते त्यांना पोलिसांनी, साळुंखे रेस्क्यू टिमनी बाहेर काढले. मयतांना व जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

या अपघातात ऋषभ चव्हाण, सौरभ भिंगे, कृष्णा राठोड यांचा जागीच मृत्यू झाला.
तर रोहन गाडे, प्रवीण सरकटे, रोशन चव्हाण हे ३ जण जखमी झाले. जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles