राहुरी विद्यापीठ, दि. 4 मार्च
university sports तिसर्या आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा स्पर्धा डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे पार पडल्या. या स्पर्धेत राहुरी, परभणी, अकोला विद्यापीठासह महाबीज आणि यजमान डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली असे पाच संघ सहभागी झाले होते.
250 च्या वर महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग दर्शविला. सांघीक खेळामध्ये टेबलटेनिसच्या राहुरीच्या पुरुष संघाने विजेतेपद तर बुध्दिबळ स्पर्धेत महिला संघाने उपविजेतेपद मिळविले. बास्केटबॉल व कबड्डीमध्ये राहुरीच्या पुरुष संघाने उपविजेतेपद प्राप्त केले.
वैयक्तीक 200 व 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत डॉ. रविंद्र बनसोड हे विजेते तर महिलांच्या 200 मी. धावण्याच्या स्पर्धेत कवीता जाधव यांनी तर 400 मी. स्पर्धेत माया जाधव या उपविजेत्या ठरल्या. पुरुष्यांच्या 800 मी. धावण्याच्या स्पर्धेत शरद शिरसाठ यांनी उपविजेतेपद मिळविले.
university sports गायनाच्या स्पर्धेत डॉ. जयप्रकाश गायकवाड हे उपविजेते ठरले.
सामना समाप्तीनंतर बक्षीस वितरण कार्यक्रम कुलगुरु डॉ. संजय सावंत यांचे शुभहस्ते झाला. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विजयी संघाचे नेतृत्व टेबल टेनिस (पुरुष) प्रा. विवेक कानवडे आणि बुध्दिबळ (महिला) डॉ. लीना शितोळे यांनी केले. क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड, डॉ. अभिजीत नलावडे आणि प्रा. राम बोरसे यांनी विद्यापीठाच्या संघासोबत राहुन मार्गदर्शन केले.
विद्यापीठ संघाच्या या यशाबद्दल कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे, नियंत्रक श्री. सुखदेव बलमे व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महाविरसिंह चौहाण यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. पुढील वर्षी होणार्या स्पर्धेचे यजमानपद राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाला मिळाले आहे.