आष्टी
kada sugar गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेल्या कडा सहकारी साखर कारखान्यासह राज्यातील 9 सहकारी साखर कारखाने चालविण्यास देण्यासाठी महाराष्ट्र सहकारी बँकेने निविदा जारी केली आहे.त्यामुळे भविष्यात कडा साखर कारखाना सुरु होण्याची चिन्ह दिसत आहेत.
आष्टी तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी कडा साखर कारखाना महत्वाचा आहे. तालुक्यातील सहकारी उद्योग म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या अनेक वर्षापासून कारखाना बंद असल्याने येथील उस उत्पादक शेतकऱ्यांना दुसऱ्या तालुक्यातील कारखान्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
गेल्या दोन वर्षापासून तालुक्यातील पाण्याची परिस्थिती चांगली असल्याने शेतकऱ्यांनी उस लागवड केली आहे. त्या शेतकऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात नसलेल्या कारखान्यांना उस द्यावा लागत आहे. आता ही निविदा काढण्यात आल्याने राज्यातील साखर कारखाने चालविणारे उद्योग समूह पुढे येऊन कारखाना चालविण्यास घेऊ शकतात अशी अपेक्षा आहे.
सध्या या कारखान्यावर राज्य सहकारी बँकेचे ३३४४.५७ लाखांचे कर्ज आहे. तर कर्मचाऱ्यांचे पगार , विजेचे बिल, सेल्स टक्स, अकृषी कर यासह इतर थकीत बाकी आहे.
kada sugar राजकारण बदलणार ?
हा साखर कारखाना चालविण्यास कर्जत- जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे उत्सुक आहेत. त्यामुळे भविष्यात या कारखान्याच्या माध्यमातून रोहित पवार यांच्या राजकारणाची बीड जिल्ह्यात एन्ट्री होऊ शकते. त्यामुळे आष्टी तालुक्यातील राजकारणाला वेगळे वळण मिळणार आहे. शेजारील कर्जत जामखेड तालुक्यातील विकास पाहता रोहित पवारांचे राजकारण आष्टी तालुक्यातील नक्कीच फायद्याचे ठरणार आहे.
आणखी वाचा :माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी नागनाथ शिंदे यांची नियुक्ती
हा साखर कारखाना सुरु व्हावा यासाठी आमदार बाळासाहेब आजबे प्रयत्नशील आहेत. आष्टी तालूक्यातील हा साखर कारखाना आर्थिक उत्पन्नाचे आणि रोजगाराचे साधन म्हणून पुढे येणार आहे.