Ambajogai
Illegal abortion अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य गुन्हेगार डॉ सुदाम मुंडे याला अंबाजोगाईच्या न्यायालयाने बुधवारी डाॅ.सुदाम मुंडे यास दोषी ठरवून शिक्षेसह दंड ठोठावला.
औरंगाबाद उच्च न्यायालयाने वैद्यकीय व्यवसाय न करण्याच्या अटीवर डॉ सुदाम मुंडे याला जामीन दिला होता. या आदेशाचे उल्लंघन करून त्याने व्यवसाय सुरू केला, यावर तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी मनाई केली मात्र त्यांच्या विरोधात जाऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. या गुन्ह्य़ात अंबाजोगाईच्या न्यायालयाने बुधवारी डाॅ.सुदाम मुंडे यास दोषी ठरवून शिक्षेसह दंड ठोठावला.
सुदाम मुंडे याला अवैध गर्भपात illegal abortion case in maharashtra प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयाने वैद्यकीय व्यवसाय न करण्याच्या अटीवर जामीन दिला होता . या आदेशाचे उल्लंघन करून डॉ.मुंडेने वैद्यकीय व्यवसाय सुरू केला त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
Illegal abortion
हे प्रकरण अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होते, बुधवारी न्यायाधिश व्ही . के . मांडे यांनी डॉ.सुदाम मुंडे यास कलम 353 अन्वये दोषी ठरवून चार वर्षे सक्त मजुरी तसचं दोन हजार रुपये दंड , कलम 33 ( 2 ) वैद्यकीय व्यवसाय कायद्यान्वये तीन वर्षे शिक्षा आणी कलम 15 ( 2 ) इंडियन मेडिकल कौन्सिल कायद्यान्वये 1 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड . अशोक विनायकराव कुलकर्णी यांनी बाजू मांडली.