शिरूर
gathering after 21 years पाटोदा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्या मंदिर व कै.प्रशांत तुकाराम पोकळे महाविद्यालयात मार्च 2001 साली दहावीच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या वर्गमित्रांचा स्नेहसंमेलन मेळावा पार पडला.
या वेळी व्यासपीठावर विद्यार्थ्यांना घडविणारे सेवानिवृत्त शिक्षक तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष ए.टी.पोकळे यांच्यासह आर.एल.उंडे,मारुती उकांडे,एस.पी.उंडे,अनंत कोकणे,टी.बी.पोकळे आणि सध्या कार्यरत असणारे मनोज पोकळे,सरपंच उद्धव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहराचे ग्रामदैवत असलेल्या पीर सय्यद बाबा यांच्या यात्रेच्या निमित्ताने सर्व वर्गमित्र जमा झाले होते.त्याचे औचित्य साधून स्नेहसंमेलन मेळाव्याचा हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वजीत कनिंगद्धज आणि पाराजी भगत या शिक्षकांसह वर्गमित्रांसोबत शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी बाबुराव काकडे,राजेंद्र पखाले यांचे अकस्मात निधन झाल्यामुळे त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.या वेळी उपस्थित शिक्षकवृंदांचे शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
त्या नंतर वर्गमित्रांनी एकवीस वर्षांनी एकत्र आल्याबद्दल परिचय देत शाळेत आणि आपल्या स्वताच्या जीवनात काय बदल झाले तसेच सध्या काय करत आहोत या विषयी प्रातिनिधिक स्वरूपात सोमनाथ अष्टेकर,श्रीकृष्ण खेडकर,गणेश पोकळे,सोमनाथ पोकळे,कल्पना अष्टेकर,वंदना कोकणे,राजश्री विश्वाद यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आपले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात करत असलेल्या कामगिरी बद्दल शिक्षकांना देखील हेवा वाटला.तसेच आपल्याला शाळेने जे काही दिले त्या बदल्यात आपणही शाळेला फुल ना फुलाची पाकळी देणे लागतोत या न्यायाने काही तरी देण्याची अपेक्षा देखील शिक्षकांनी व्यक्त केली.
रविवार सुट्टीचा दिवस असताना देखील 21 वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळा भरवत आपले जुने दिवस आणि आठवणी जाग्या करत उजाळा देण्याचे काम केले.शेवटी विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र मिळून सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन गोकुळ पवार यांनी केले तर आभार सुरेश पोकळे यांनी मानले.
निद्रिस्त गणेशाच्या यात्रेस प्रारंभ
gathering after 21 years शाळेला 51 हजार रुपये देण्याचा संकल्प
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 22 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जयंती निमित्त शाळेच्या भौगोलिक आणि सर्वांगीण विकासासाठी या बॅचच्या वतीने 51 हजार रुपये वर्गणी देण्यात येणार आहे.कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी हा अनोखा संकल्प केला असून शिक्षकांच्या उपस्थितीत सदरील रक्कम शाळेला देण्यात येणार आहे.