अनुप कुसूमकर
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत आयोजित भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेतील टीका-टिपणी/संभाषण इत्यादीसंदर्भात प्रसार माध्यमे,समाज माध्यमे यावर मत/अभिप्राय व्यक्त केल्यास उमेदवारास प्रतिरोधीत अर्थात डीबार करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहसचिव यांनी दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतीप्रक्रियेसंदर्भात एखाद्या विशिष्ट पध्दतीने निर्णय घेण्याबाबत अथवा निर्णय न घेण्याबाबत कोणत्याही प्रकारे प्रयत्न केल्यास अशी कृती आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजण्यात येईल व अशा प्रकरणांबाबत आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात येईल असे आयोगाच्या दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग उचलणार कडक पाऊले
आयोगाच्या कार्यपध्दतीविषयी अथवा काही निर्णयांविषयी नाराजी असणाऱ्या, तसेच आयोगाच्या काही निर्णयांमुळे प्रभावित होणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या कार्यपध्दती अथवा निर्णयांवर जाहीर टीका-टिपणी करण्यात येते. तथापि, आयोगावर टीका-टिपणी करत असताना शासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या भावी लोकसेवकांकडून सार्वजनिक सभ्यतेचे भान ठेवून संसदीय व सुसंस्कृत भाषा शैलीचा वापर केला जाणे अपेक्षित आहे. परंतु काही उमेदवार/व्यक्ती यांच्याकडून विविध प्रसारमाध्यमे / समाजमाध्यमे यावर मत/अभिप्राय व्यक्त करताना किंवा दूरध्वनीवरुन संवाद साधताना असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेचा वापर करण्यात येत असल्याची बाब आयोगाच्या प्रकर्षाने निदर्शनास आली आहे.
कोण आली रे कोण आली? बीड जिल्ह्याची रेल्वे ताई आली
आयोगास निदर्शनास आलेल्या उपरोक्त बाबींची आयोगाच्या कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात येत असून अशा उमेदवार / व्यक्ती यांच्यावर संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. तसेच, आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीपासून संबंधिताला कायमस्वरुपी अथवा काही विशिष्ट कालावधीसाठी प्रतिरोधित (Debar) करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे