आष्टी
कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेलच कि, कुठपर्यंत आलीय ahmednagar beed parli railway line status
नगर बीड परळी रेल्वे? ahmednagar beed parli पण सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. रेल्वे धावतेय तेही तिच्या गतीने. म्हणजेच काही दिवसातच या रेल्वे मार्गाचे आष्टी पर्यंतचे टेस्टिंग होणार हे नक्कीच…
अनेकांनी अहमदनगर बीड परळी रेल्वे beed parli vaijnath मार्गाचे स्वप्न दाखवले ते आता लवकरच पूर्ण होईल असे वाटू लागले आहे.
बीड जिल्ह्यातील जनतेसाठी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्याचमुळे त्यांना या झुकझुक गाडीची आस लागली आहे.
दोन वर्षापूर्वी अहमदनगर पासून ते सोलापूर वाडी दरम्यात ह्या रेल्वेची चाचणी घेण्यात आली होती.beed railway station
एकूण ३५ किमी अंतर ही चाचणी घेण्यात आली होती. आतापर्यंत दोन चाचण्या झाल्या. एकदा नगर ते नारायणडोह पर्यंत बारा किमी, आणि नगर ते सोलापूरवाडी ३५.५ किलोमीटर.
आता या आठवड्यात नगर ते आष्टी beed railway latest news या साठ किलोमीटर अंतरावर हाय स्पीड चाचणी घेण्यात येत आहे.
नगर पासून नारायणडोह पर्यंत येण्यात येण्यास या रेल्वे साठी अनेक वर्षे लागली.
दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी या साठी मोठे परिश्रम घेतले.
त्यांच्याच प्रयत्नाने या रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध झाला. किंबहुना राज्य सरकारने हि यासाठी निधी दिला आहे. मात्र मोठा वाटा हा केंद्र सरकारचा आहे.
नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला गती मिळणार?
अहमदनगर-बीड-परळी nagar beed parli railway line status हा रेल्वेमार्ग railway line जिल्ह्यासाठी महत्त्वाचा विकास प्रकल्प आहे.या रेल्वे मार्गाची मागणी फार जुनी होती.
एकूण २६१ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला १९९५ मध्ये मंजुरी मिळाली.
beed parli railway route map त्यावेळी केवळ ३५३ कोटी खर्च अपेक्षित होता. मात्र, तत्कालीन सरकारने या साठी निधी न दिल्याने हा प्रकल्प अनेक वर्षे तसाच पडून राहिला.आता या रेल्वे मार्गासाठी आता २८०० कोटीची आवश्यकता आहे.
ahmednagar beed parli railway line status I अहमदनगर ते आष्टी या साठ किलोमीटर अंतरावर धावणार हाय स्पीड रेल्वे
या रेल्वे मार्गावर अनेक मोठे पूल बांधण्यात आले. आष्टी तालुक्यातील खुंटेफळ नजीकच्या नदीवर मोठे १३ गाळे असलेला मोठा पूल बांधण्यात आला आहे.beed railway news
पुलाची उंची ३३ फुट उंच आहे. त्यासाठी मोठे तांत्रिक कौशल्य वापरून दक्षिण रेल्वे वरील सर्वात मोठा गल्डर टाकून रेल्वे रूळ अंथरण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी मोठे पूल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे या कामाला वेळ लागत आहे.
सुरुवातीला नारायणडोह पर्यंत चाचणी घेण्यात आली. त्यानंतर 2019 मध्ये बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात सोलापूरवाडीपर्यंत रेल्वे धावली आहे.
आतापर्यंत बीड जिल्ह्य हद्दीत २३.५ किलोमीटर रेल्वे प्रत्यक्ष धावली आहे .
नगर ते नारायणडोह या १२ किलोमीटर अंतरावरील रेल्वे मार्गावर मार्च २०१८ मध्ये रेल्वेचे इंजिन धावले होते .
ahmednagar beed parli railway line status सध्यस्थीतीत नगर ते आष्टी पर्यन्त ६० किमी अंतरावर रेल्वेचे काम १०० टक्के पूर्ण झाले असुन या आठवड्यात चाचणी घेण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.